गृहरक्षक दलातील जवानानी केली वृद्धांची शेवा. हिवरी येथील युवकाचा असाही उपक्रम...
ज्यांना कोणीही नाही किंवा ज्याचा सांभाळ स्वतःचे मुल करण्यास तयार नाही. अशा निराधार गरजू वृध्दांना आधार देण्याकरिता अनेक हात पुढे येत असतात. त्यामध्ये कोणी आर्थिक मदत करत असतात तर कोणी आपल्याला शक्य होईल ती मदत करत असतात. अशातच हिवरी येथील एक ध्येयवेडा तरूण वर्षातील एक दिवस निराधार वृद्धांसोबत त्यांच्या सेवेत घालवायचा हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून सलग तिसऱ्या वर्षी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करणारा हा अवलिया म्हणजे हिवरी येथील विवेक देविदासराव ससनकर.
विवेक हा यवतमाळ जिल्हा गृहरक्षक दलात कार्यरत असून यासोबतच तो आपले शिक्षण पूर्ण करून हिवरी येथे केसकर्तनालय चालवतो.
आज सामान्यतः आपला परिवार आप्तेष्ट, मित्र मंडळी यांच्या समवेत मौज मजा करून गावाच्या मुख्य भागात शुभेच्छा फलक झळकावून अमाप पैसा खर्च केल्या जात असल्याचे पाहावयास मिळते. परंतू विवेकचा वाढदिवस मात्र त्याच्या सेवाभावी कार्यामुळे नेहमीच आठवणीत राहतो. कारण विवेकनी सलग तिसऱ्यांदा आपला वाढदिवस संत दौला महाराज वृद्धाश्रम, उमरी पठार येथे वृद्धांची सेवा करत साजरा केला आहे. यामध्ये विवेकनी वृद्धांची दाढी व कटिंग करून देऊन महागड्या पावडर, क्रीम, लोशन चा वापर करत खाऊचे वाटप करण्यात आल्याने वृद्धांनी समाधान व्यक्त केले.
त्याचप्रमाणे कुठलेही केमिकल युक्त केक न कापता सर्वाला आरोग्याच्या दृष्टीने ऊपयुक्त असणारी शेतक-याकडील पपई कापत एक आदर्श ठेवताना वाढदिवस साजरा केला.
