Home यवतमाळ यांच्या पेक्षा इमानदार नाही कुणी म्हणून यांचा वाढदिवस करतो आम्ही

यांच्या पेक्षा इमानदार नाही कुणी म्हणून यांचा वाढदिवस करतो आम्ही

8

यांच्या पेक्षा इमानदार नाही कुणी म्हणून यांचा वाढदिवस करतो आम्ही

आधुनिकीकरण आणि धावपळीच्या युगात आपण आपल्या प्रिय व्यक्ती, इष्टमित्रांचा वाढदिवस,लग्न अथवा छोटेमोठे प्रोग्राम विसरतो व जाणं टाळतो म्हणून आज आपण सगळ्या नात्यापासून हळूहळू दूर जातोय.
अशाही परीस्थितीत आमच्या गावाच्या(बोथ बोडण) *मा. श्री. कवडु जंगलूजी शेळके* या सामाजिक कार्यकर्त्याने सगळ्यांना आश्चर्य वाटेल असा उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या पाळीव श्वापदांचा मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. ह्यातून एक आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
आपली आजची तरुण पिढी आपलंच खाऊन कधी आपला घात करतील अश्या भाईगिरीत अडकली आहे. त्यांच्या वाईट वृत्तीमुळे अनेक युवकांचे परिवार उध्वस्त होत आहेत आणि आपला यवतमाळ जिल्हा बदनाम होत आहे. शहरातील हा खुनी वारसा व भाईगिरीचे वातावरण आज यवतमाळ लगतच्या सर्व खेड़यापाडयात बघायला मिळते व आपल्या स्वार्थासाठी कोणाचा घात करेल ह्याचा काही नेम नाही. आपल्या राजकीय नेत्यांच्या खाऊवृत्तीमुळे देश कंगाल होत चाललाय.
भाई, दादांचा आणि राजकीय नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्यात जेथे धन्यता मानल्या जाते तेथे सर्वात इमानदार व मालकाशी एकनिष्ठ राहणाऱ्या व वेळप्रसंगी स्वतःचा जीव देणाऱ्या कुत्रा ह्या पाळीव प्राण्यांचा वाढदिवस करण्याचे ठरविले आहे. आपल्या घरासोबतच मालकाच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या ह्या श्वापदांचे जितके कौतुक करावे तितके कमीच. या निस्वार्थी परोपकाराची परतफेड म्हणून श्री. शेळके यांनी हा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन….
भाईचा व नेत्यांचा वाढदिवस साजरा करून गाव व शहर खराब करण्यापेक्षा आपल्या नातेवाईकांचा, आई- वडिलांचा, मित्रांचा व पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करा ही विनंती….

Copyright ©