Home यवतमाळ रघुनगर(घोटी) येथिल विजू चे हरिद्वारात योगाचे प्रदर्शन

रघुनगर(घोटी) येथिल विजू चे हरिद्वारात योगाचे प्रदर्शन

12

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

रघुनगर(घोटी) येथिल विजू चे हरिद्वारात योगाचे प्रदर्शन
——————————————–
योगगुरू बाबा रामदेव यांचे सोबत गिरविले योगाचे धडे
——————————————–
आदिवासी समाजातील विजूचे होतेय सर्वत्र कौतुक
——————————————–
घाटंजी- तालुक्यातील घोटी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या रघुनगर (पारधी बेडा) म्हणून परिचित असलेले छोटेशे खेडे गाव येथिल विजू गुलाब राठोड या युवकाने टिव्ही वर योगगुरू बाबा रामदेव यांचे योगा पाहून स्वतःच्या अंगी जिद्द बाळगून योगा चे धडे गिरवले यात त्याने थेट हरिद्वार गाठले आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्या सोबत आपल्या अंगी असलेल्या योगाचे प्रदर्शन करून यवतमाळ जिल्ह्यासह आपल्या छोट्याशा गावाचे नाव लौकिक केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
विजू राठोड हे रघुनगर (घोटी) येथिल रहिवासी असून ते फासे फारधी या आदिवासी समाजात मोडतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या छोट्याशा खेड्यातील वस्तीशाळेत झाल्याचे या शाळेवरील तेव्हा तिथे कार्यरत असणारे शिक्षक अविनाश राठोड यांनी सांगितले. विजू हा एक गरीब कुटुंबातील असताना सुध्दा गावात जेमतेम दोनच टीव्ही होत्या या टीव्ही चा आधार घेऊन आस्था चॅनल लावायला लावायचे आणि योगगुरू बाबा रामदेव यांचे योगासन पाहून मनाशी जिद्द बाळगून योगाचे धडे गिरवले यात त्यांना त्यांच्या आई वडिलांचे सहकार्य मिळत जावून आपण योगगुरू बाबा रामदेव यांचे पर्यंत हरिद्वार येथे पोहचावे असे प्रोत्साहित केल्याने विजूने खूप प्रयत्न सुरू केले. यात त्यांना यश मिळू लागले यात त्यांनी हरिद्वार गाठले. आणि त्यांच्या अंगी असलेल्या योगाचा एवढा योग आला की त्यांना योगगुरू बाबा रामदेव यांच्या बरोबरीने राहून योग प्रदर्शन करण्याचा मान मिळाला हा त्यांचा योग सर्वत्र पसरल्याने त्यांच्या सन्मानासोबत छोट्याशा गावाचा नावलौकिक झाले. त्यांच्या योगावरून योगात असलेल्या सर्व पदव्या देवु सोबत इतरा पेक्षा थोडी फार आर्थिक तरतूद जास्त ठेवू म्हणत त्यांची जबाबदारी स्वीकारली. यावरून एका छोट्याशा गावातील युवक विजू राठोड याने केलेल्या कार्याबद्दल त्यांना नेहमी मार्गदर्शन करणारे त्यांच्या अडचणीत सहकार्य करणारे घोटी ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच धनराज पवार, डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी विद्यालयातील शिक्षक निलेश राठोड, केळापूर (तांडा) येथिल शिक्षक अविनाश राठोड यांचे कडून कौतुक करण्यात आले. याच सोबत त्यांचेवर घोटी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©