सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान
ठाणेदार चव्हाण साहेबांचा पारवा पॅटर्न मुबारक तंवर यांनी गाजवला
मागील आठवड्यात यवतमाळ येथील नियोजन भवनात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. मुबारक तंवर यांनी जिल्हाधिकारी मा. श्री. अमोल येडगे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या उपस्थितीत पारवा पॅटर्न ची मुद्देसूद मांडणी केली.
पूर्वीचे ठाणेदार गोरख चौधर यांच्यावेळी सावळी सदोबा भागातील परिस्थिती कशी स्पोटक होती व त्यानंतर पारवा पोलीस स्टेशन ची सुत्रे हाती घेताच ठाणेदार विनोद चव्हाण यांनी ती कशी हाताळली, अवैध धंद्यांना कसा लगाम लावला, युवकांना व महिलांना कसे विश्वासात घेतले, सावळी सदोबा परिसरातील मागासलेपन यावर विस्तृत मुद्देसूद मांडणी केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी त्यांच्या भाषणात मुबारक तंवर यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेतली.
सावळी सदोबा परिसरातील मागासलेपण व ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या कार्यशील कार्यपद्धतीवर मुबारक तंवर यांनी टाकलेला प्रकाश पाहता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यापुढे सावळी सदोबा परिसरातील समस्यांची दखल घेणारच यात दुमत नाही.
सावळी सदोबा भागातील इतर नेते सत्तेत असूनही सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात परंतू मुबारक तंवर पदावर असो अथवा नसो ते नेहमीच आपल्या मागासलेल्या भागातील समस्यांची निःपक्ष मांडणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे करत असतात.
जिल्ह्यातील दोन प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यापुढे सुद्धा आपल्या मागासलेल्या क्षेत्रातील समस्या मांडायला मुबारक तंवर डगमगले नाही. एवढे करूनही स्वतःचे मोठेपण व प्रशंसा करण्याकरिता मुबारक तंवर यांनी कुठेही याबद्दल चर्चा केली नाही.
पद असो अथवा नसो आपल्या भागावरील प्रेम काय असते हे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपूढे आपल्या भागातील समस्या मांडून दाखवून दिले.
सावळी सदोबा सर्कलच्या इतिहासात अनेक लोक आले व गेले परंतू मुबारक तंवर या परिसरातील जनतेच्या कायम स्मरणात राहतील.
मुके आणि बधीर लोकप्रतिनिधी असण्यापेक्षा बोलकेच लोकप्रतिनिधी असले तर त्याचा काय प्रत्यय येतो हे यावरून स्पष्ट होते. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आजवर सावळी परिसरात भेट दिली नाही परंतु मुबारक तंवर यांनी मांडलेल्या मुद्देसूद माहिती ऐकल्यानंतर ते नक्कीच भविष्यात सावळी सदोबा भागाला भेट देतील असे वाटते.
