” गुरुदेव सेवकांनी साजरा केला संविधान दिन “
मंगरूळ- श्री गुरुदेव सेवा मंडळ , मंगरूळ (तरोडा) यांच्या वतीने सव्वीस नोव्हेंबरला ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ” भारतीय संविधान दिन ” मोठ्या उत्साहात साजरा केला.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व विश्ववंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व मालार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुरुदेव उपासक , मान्यवर तसेच गावातील स्त्री-पुरूषांच्या उपस्थितीत प्रथमतः शिस्तप्रिय रीतीने सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे या देशाला लाभलेले एक अनमोल रत्न आहे. या देशाचा खरा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे ” भारतीय संविधान ” हाच होय. माणसाला जीवन जगण्यासाठी ज्या कायद्याची व नियमांची आवश्यकता आहे ती सर्व संविधानामध्ये सामावलेली आहे.अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षाने भारतीय संविधानाला व बाबासाहेबांना नमन केले आहे इतकी प्रभावी व स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा समतोल साधणारी भारतीय राज्यघटना आहे असे प्रशंसनीय गौरवोद्गार गुरुदेव उपासक डॉ. अनंतकुमार सूर्यकार यांनी केले.
सौ. कांताताई संजय कांबळे सभापती पं.स.यवतमाळ ,अमोल जयस्वाल, सचिन भेडेकर, वासुदेव थोरात, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, डॉ. अनंतकुमार सूर्यकार, संजय कांबळे, विजय ढोके, गणेश सोनोने, नारायण सूर्यकार, डॉ. गोविंद अवझाडे, चेतन भेडेकर, गिरीधर भगत , विठ्ठल कोडापे , सुधाकर धोंगडे, अवधूत गवळी, ताराचंद चव्हाण, शंकर पोहोरकर, गणेश जोगे, दीपक हारे, गोपाल उके, विशाल राठोड, रूपेश चव्हाण, चंदाताई मेश्राम, माया पवार, राधाताई मोडले, कमल गुघाणे ,नंदाताई सोनटक्के यासह गावातील बहुसंख्य स्त्री-पुरूष कार्यक्रमामध्ये सहभागी होते.
भारतीय संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच राष्ट्रगीत व राष्ट्रवंदना घेण्यात आली . अरूण सोनटक्के यांनी सर्वांचे आभार मानले
