रासेयो तर्फे भारतीय संविधान दिन साजरा-
विद्या प्रसारक मंडळ, द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय , यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना एकका द्वारे ” भारतीय संविधान दिन ” सव्वीस नोव्हेंबरला महाविद्यालयात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली.
भारतीय संविधान विश्वातील अनेक देशांच्या संविधानाच्या तुलनेत भरभक्कम प्रभावी व मजबूत आहे. घटनाकर्त्यांनी भविष्याचा वेध घेऊनच अशी नियमावली बनवली की , तिच्या अस्तित्वाला कधीही धक्का बसणार नाही. तो एक जीवन जगण्याचा प्रभावी राष्ट्रीय ग्रंथ ठरला. असे प्रसंगी प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा यांनी उवाच केले.
डॉ.अनंत सूर्यकार, राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले. याप्रसंगी डॉ. गणेश खंडेराव, डॉ. राहूल एकबोटे,प्रा. किशोर तायडे, डॉ. चंदनखेडे, डॉ. जाधव व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रम हा कोविड-१९ च्या नियमानुसार घेण्यात येऊन डॉ. अनंत सूर्यकार यांनी प्रास्ताविक व ऋण निर्देश व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला.
