भाजी विक्रेत्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयातच मांडले होते ठाण
भाजी विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून जिल्हा अधिकारी कार्यालयातच भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले होते,आम्हाला न्याय द्या अशी मागणी करीत जागा मिळाल्या बाबत निवेदन देण्यात आले.
प्रश्न निकाली न निघाल्यास गुरुदेव युवा संघ तिव्र आंदोलन करणार
यवतमाळ गेल्या २५ ते ३० वर्षा पासुन चिल्लर भाजी विक्रेते दत्त चौक येथे आपला व्यवसाय करीत असून त्यांना काही दिवसांपासून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरीताई मडावी यांच्या आदेशा प्रमाणे नगर परिषद कर्मचारी हे चिल्लर भाजी विक्रेत्यांचा गोर गरिबांच्या गाड्या जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहे तसेच वाहतुक शाखेचे अधिकारी सुद्धा या सामान्य गरिब गाड्या भाजी विक्रेत्यांच्या गाडी वरील कारवाई करण्यात येते त्यांचे गाडी वरील वजन काटे जप्त करून दंडात्मक कारवाई केल्या जात आहे त्यामुळे ८० चिल्लर भाजी विक्रेत्यांचे कुटुंब बेघर झाल्याचे दिसुन आहे त्यामुळे गोर गरिब भाजी विक्रेत्यांवर अनेक कर्जाचे डोंगर वाढत आहे झाले आहे त्यामुळे आपल्या परिवाराचा कसा उदरनिर्वाह करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे आज दिनांक २६ नोव्हेंबर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कडे व पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या कडे धडक मोर्चा नेण्यात आला या मध्ये चिल्लर भाजी विक्रेत्यांना जागा देण्यात यावी भाजी विक्रेत्यांना पिवळ्या पट्याच्या आत मध्ये गाडी लावण्याची परवानगी देण्यात यावी या मध्ये मा.जिल्हाधिकारी यांनी सु सुविधा व व्यवस्था सुरळीत राहील सुरळीत राहण्यासाठी आम्ही तुमच्या चिल्लर भाजी विक्रेत्यांच्या साठी मुख्याधिकारी नगर परिषद व पोलिस अधीक्षक यांच्या कडे पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले या वेळी गुरु देव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, उज्वल तायडे, मंगेश नेवारे, गणेश शेळके, मधुकर उजवने, कवडु पाटील, पारस थेरे, अभिषेक वासनिक, आकाश राऊत, आकाश मूनेश्वर, राजु घोसे, अनिस शेख, हिंमत जाधव, वैशाली जवादे, कुसुम पाटील, संदिप ढोले, सुशील अडकीने, सुरज सहारे, अनिता बाई यांच्या सह 80 चिल्लर भाजी विक्रेते उपस्थित होते
