हीवरी येथे कुटुंब नियोजन शिबिर संपन्न
हिवरी प्रा.आ. केन्द्रा अंतर्गत हे प्रथमच कुटुंब नियोजन शिबिर आयोजित करण्यात आले असून या मध्ये २५ महिला लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यांची यशस्वी शस्त्र क्रिया करण्यात आली या करीता यवतमाळ येथील तज्ञ डॉ.माणिकराव घोरसडे यांनी यशस्वी शस्त्र क्रिया केली
हिवरी तिवसा माळ म्हसोला येथील एकूण २५ लाभार्थीनी या शिबिरात सहभाग घेतला त्यांच्या यशस्वी शस्त्र क्रिया करण्यात आल्या हिवरी प्रा.आ. केन्द्रा अंतर्गत हे प्रथमच शिबिर असल्याने अनेकांना या शिबिराची उत्सुकता लागली होती हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल राउत आणि परिचारिका, विजया चातारकर, संजीवनी पवार, वनिता गिलबिले, रेखा वाकळे,अर्चना गावंडे,शीतल फुलमाळी प्रियांका घूले, संदीप भोयर,प्रदीप वानखेडे राजेंद्र दवे,ललिता नागलवाडे ,अशोक इटकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
