मंगरूळ येथे काकड आरती विसर्जन
गुरुदेव सेवा मंडळ मंगरुळ, नोंदणी क्रमांक एफ- २०९३८ तर्फे पवित्र कार्तिक मासच्या निमित्ताने दररोज काकड आरतीची प्रभातफेरी होत होती.
त्रिपुरारी पौर्णिमेला गावातून काकड आरतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच आवळी पूजन करण्यात आले. विठ्ठल रखुमाई तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन रस्त्याने तसेच चौकाचौकात करण्यात आले. रस्ते रांगोळ्यांनी सजले होते. एकंदरीत गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. काकड आरतीच्या विसर्जन मिरवणुकीत गावातील स्त्री, पुरुष व बाल मंडळी प्रामुख्याने सहभागी होती. नदीवर जाऊन काकड आरतीचे विसर्जन करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळाचे रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, डॉ. अनंतकुमार सूर्यकार, विजय ढोके, गणेश सोनोने, अवधूत गवळी, शंकर पोहोरकर, नारायण सूर्यकार, ताराचंद चव्हाण, सुधाकर धोंगडे, गणेश बनकर, दीपक हारे , विशाल राठोड, रुपेश चव्हाण राधाबाई मोडले अवझाडेताई व बालमंडळी प्रामुख्याने मिरवणुकीत सहभागी होती. प्रसंगी गोपाळकाला वाटून व महाप्रसाद सेवन करुन काकड आरतीची सांगता झाली.
