मी बघितलेला ध्येयवेडा ठाणेदार विनोद चव्हाण
——————————————-
आपण आपल्या जिवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे आहोत. आपण आपल्या कर्मानुसार आपला भविष्यकाळ ठरवू शकतो. त्यातूनच आपल्याला जनसेवा करण्याचा योग येत असेल त्या योगाचा पुरेपूर वापर करून लहानापासून मोठ्यापर्यंत, गोर गरीबांच्या सुख दुःखात सहभाग घेत जाती धर्माचा विचार दूर सारून खाकी वर्दीतील देव माणूस घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनला आमच्या भाग्याला लाभलेले ध्येयवेडे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या बद्दलची माझी एक छोटीशी विचारधारा.!
पोलीस अधिकारी म्हटले की, प्रत्येकांच्या मनात काहीना काही भिती असतेच, आणि ती साहजिकच आहे. कारण शेवटी ते एक कायद्याचे रक्षणकर्ते त्यामुळे ते आपल्या जवळपास आपल्या आजूबाजूला दिसले की, कुठे आपण चुकलो तर नाही ना..! ही बाब पोलिसांच्या बाबतीत सर्वश्रृत आहे. त्याचसोबत दिवसेंदिवस वाढीस गेली ती व्यसनाधीनता दारू, मटका, जुगार या सारख्या बाबी सोबतच भांडणतंटे, शेतीचे, जागेचे वाद, यासारख्या असंख्य समस्या ग्रामीण भागात भेडसावतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी साऱ्या अपेक्षा आपण पोलीस प्रशासनाकडून बाळगतो. मात्र या साऱ्यासार बाबीवर पोलिसांना नियंत्रण मिळविणे एवढेही सोपे नसते. प्रत्येक बाबीची कायदेशीररित्या अमलबजाणी, वरिष्ठांचे आदेश त्यामध्ये राजकिय हस्तक्षेप जनतेतील ताळमेळ या सर्व बाबीतून मार्गक्रमण करीत आपले कार्य निभवावे लागते. यात प्रत्येकांचे आपल्या सोयीने समाधान होईल हे सुध्दा शक्य नाही. हे सर्व कार्य करण्यासाठी परिसरनिहाय व्याप्ती पाहून पोलीस स्टेशनची निर्मिती केली आहे. आणि त्या- त्या पोलीस स्टेशनला ठाणेदार दिल्या गेले आहेत. त्यानुसार आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत ते आपले कारोभार चालवीत असतात. कायदा हा सर्वांसाठी सारखा असला तरी त्यासाठी कार्यकरण्याची शैली ही प्रत्येक ठाणेदाराची वेगवेगळी असते. म्हणूनच ना! कोणत्याही ठाण्याला नविन पोलीस अधिकारी आले की, प्रत्येकजन नविन अधिकारी कसा ही चर्चा करतांना मी बहुतांशदा ऐकले आहे. यावरूनच पारवा पोलीस स्टेशनला आलेले मी बघितलेले ध्येयवेडा ठाणेदार विनोद चव्हाण हे फार आगळे वेगळे व्यक्तिमत्त्वाचे आहेत. उच्च विद्याभूषित असून ते आदिवासी बहुल डोंगराळ भागातील आंध्रप्रदेश सीमेलगत वसलेल्या पारवा पोलीस स्टेशनला मिळाले आणि आमचे भाग्यच उजाळले! ते रुजू होवून जेमतेम दोन महिने गाठले. त्यांनी रुजू होताच बोटावर मोजण्या एवढ्या दिवसात पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या १०२ गावाचा अभ्यास करून प्रत्येक गावातील नागरिकाशी संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. त्यातच सहज गोपनीय माहिती मिळवित प्रथम अवैध धंदे, दारू, मटका, जुगार याला लगाम लावित आपल्या कारवाईच्या प्रभावाचा ठसा उमटविला. ग्रामीण जनतेला परिचित असलेल्या हे पोलिसांचे काम समजून ते नविन ठाणेदार सुरुवातीस करतात हे बोलून जनता समाधान मानू लागली. मात्र दिवसा मागून दिवस जात नाही तोच या ध्येयवेड्या ठाणेदाराकडून नव नवीन कार्य पाहून जनता अचंबित व्हायला लागली. रात्री- बेरात्री ठानेक्षेत्रातील गस्त, धडक कारवाई यावर प्रसार माध्यमांनी सुध्दा या ठाणेदाराचे नविन काय असणार याची प्रतिक्षा सुरू केली. एवढ्यातच ते ज्या गावात पोहचले नसतांनाही त्या गावात या ठाणेदाराच्या कार्यशैलीतून आपोआप सुधारणा व्ह्यायला लागली हे येथे विशेष..
काही दिवसानंतर ते कायद्याच्या बाजू समजावीत सर्व जाती धर्मातील सण-उत्सवात सहभागी होवून उस्फुर्त भाग घेवू घेण्यास सुरुवात केली. यात त्यांचा जनतेतील सलोखता वाढीस लागल्याने प्रत्येक गावातील घटना माहिती होण्यास सोपे झाले. प्रत्येक कायद्याच्या बाजू प्रभावित ठेवून ते आदिवासी दंडार नृत्य असो की इतरांचे सांस्कृतिक कार्यक्रम ते सर्वसामान्य सारखे स्वतः सहभागी होवुन ग्रामीण भागातील जनतेचे आनंद द्विगुणित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न जनतेला खूप आवडल्याने पारवा ठाण्याला आमच्या भाग्यात देव अवतरला असे समजून त्यांना गावो गावी बोलावून त्यांच्या सत्काराची मालिका सुरू आहे. कोणत्याही गावातील सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना फोन केला किंवा भेटले तर त्यांची बाजू सुरळीत ऐकून त्यात सकारात्मक मार्ग काढतात. त्यामुळे जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ह्या ध्येयवेडे ठाणेदारानी उनकेश्र्वर येथिल देवस्थान परिसरात राहणाऱ्या निराश्रिताना ऐन दिवाळीच्या पर्वावर दोन वेळचे जेवण व थंडीचे दिवस पाहून उबदार कंबल चे वाटप करून त्या निरश्रिताना आसरा दिला. मागील काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी प्रत्येक्षात व शोसल मीडियावरून महत्वाचे मार्गदर्शन करीत हिम्मत वाढीस लावली. एवढेच नव्हे तर होतकरू उच्च शिक्षित विद्यार्थी दिसले की त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. एकच क्षेत्र नव्हे तर प्रत्येक क्षेत्राशी निगडीत राहून कायदा सुव्यवस्था या साऱ्या बाजू व्यवस्थित हाताळून पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रा पुरते मर्यादित विचार न करता एक सामाजिक दायित्व निभावीत आहे. पोलीस स्टेशनला येणार जाणार नागरिकांना सन्मानजनक वागणूक देत त्यांचे समाधान ते आपले समाधान या वृत्तीने वागताना दिसत आहे. यात ते पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस कर्मचारी बांधव यांना विश्वासात घेऊन त्यांनाही आपलेसे वाटणारे मी बघितलेला ध्येयवेडा ठाणेदार विनोद चव्हाण यांचेसाठी माझ्या मनातील एक छोटीशी विचारधारा लिहिण्याचा माझा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न..!
श्री. राजु किसन चव्हाण
कार्यकारी संपादक
रा. केळापूर (तांडा) ता. घाटंजी
जि. यवतमाळ.
पो. स्टे. पारवा
