Home यवतमाळ रास्तभाव दुकानदार संघटने कडून विधवा महिलांना साडीचोळी वाटपाच

रास्तभाव दुकानदार संघटने कडून विधवा महिलांना साडीचोळी वाटपाच

13

 संपादक सदानंद जाधव

रास्तभाव दुकानदार संघटने कडून विधवा महिलांना साडीचोळी वाटपाच

दिग्रस तालुका रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने महिला सन्मान कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील विधवा महिलांना आज दि.१९ नोव्हेंबर,शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात साडीचोळी वाटपाचा कार्यक्रम आणि रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या दुकानदार बांधवांचा स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला.सदर साडीचोळी वाटपाचा कार्यक्रम माजी वनमंत्री तथा विद्यमान आमदार संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवंतराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. दिग्रसचे प्रभारी तहसीलदार सुधाकर राठोड, संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बंडूअण्णा मात्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार पुंडलीकराव इंगोले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रास्तभाव दुकानदार संघटनेचे दिग्रस तालुका अध्यक्ष प्रल्हाद कोरडे, उपाध्यक्ष नामदेव पवार,सचिव फिरोज खान, ज्योतिसिंग राठोड, नरेंद्र चव्हाण आरंभीकर, विठ्ठल जाधव,राम राठोड, विनोद जाधव यांच्यासह रास्तभाव दुकानदार संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

Copyright ©