Home यवतमाळ केळझरा येथे काकड आरती समाप्ती

केळझरा येथे काकड आरती समाप्ती

11

सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान

केळझरा येथे काकड आरती समाप्ती

आज दिनांक 19/11/2021 रोज शुक्रवार ला केळझरा येथील काकडा मंडळाच्या वतीने आज काकडा समाप्ती आणी नगर भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंचा उषा ताई मेसराम प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भाऊ राठोड तर सत्कार मूर्ती म्हणून पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण हे होते प्रथम महिलांनी ठाणेदार ओक्षवान करून मोठया हर्सुल्लसात स्वागत करण्यात आले या प्रसंगी गावच्या दिंडी मंडळाच्या वतीने ठाणेदार यांचा शाल आणी श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी प्रकाश राठोड यांचाही सत्कार करण्यात आला दिंडी ची प्रभात फेरी आणी त्याच महत्व काय असते हे ठाणेदारानी अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितले सूत्र संचालन रुपेश खरंतडे यांनी केले या वेळी अनेक ग्रामस्थ व बाहेर गावतीतील सद्भक्त उपस्थित होते

Copyright ©