महाराष्ट्र गवळी समाज संघटना कार्यकारिणी गठीत
पुसद दिनांक. 15 नोव्हेंबर 2021 रोजी श्रीकृष्ण मंदिर काकडदाती ता.पुसद जि.यवतमाळ येथे महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसदची नविन कार्यकारनी गठीत करण्यात आली. त्या वेळेस समाजाचे सहविचार सभेत सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी अमोल दत्तराव साखरे,रा.काटखेडा. तसेच उपाध्यक्ष पदी आशिष केशवराव साखरे, रा. बोरगडी. सचिव पदी विनोद केशवराव पुलाते रा.श्रीराम पुर पुसद. कोषाध्यक्ष पदी संतोष नामदेव ढोकणे रा. पोखरी. सहसचिव पदी ज्ञानेश्वर नारायण गादेकर रा.उदासी वार्ड पुसद. कार्याध्यक्ष पदी. दत्तराव भिमराव काळे रा. ईसापुर ता.पुसद याची निवड करण्यात आली यावेळेस सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दादारावजी पुलाते रा.बोरगडी हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य दिलीपराव पारध काकडदाती, पं.स.उपसभापती भगवानराव भाकरे, बोरी. गोधारीराव सुपले, माडवा,गजानन हिगमिरे कोपरा. किसनराव महाराज काकडदाती, नारायण पुलाते काकडदाती, विलासराव डंगाले इसापुर, दिगांबर साखरे खडकदरी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पं.स. विस्तार अधिकारी सुनिल साखरे काटखेडा यांनी केले. तर त्यास बबनराव पारध यांनी अनुमोदन दिले. आभार महाराष्ट्र गवळी समाज युवक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरूण पुलाते यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता राजकुमार धाड, मंगेश करण, एकनाथ पुलाते, बाबुराव कुबडे, जितेंद्र लाडे, विलासराव फुके, शंकरराव माटे, वैभव फुके, यांनी प्रयत्न केले.
