कार्यकारी संपादक राजू चव्हाण
घाटंजी पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणाने जनतेत वाढतोय रोष
–——————————————-
घाटंजी पोलिसांची भिती पावते लोप
——————————————–
अवैध्य धंदयाना आले उधाण
——————————————–
घाटंजी- पोलीस प्रशासन म्हटले की,सर्वसामान्यांपासून प्रत्येक नागरिक त्यांच्या अवैध धंद्यांपासून तर ईतर समाज विघातक गोष्टीवर अंकुश ठेवतील अशी अपेक्षा ठेवतो. मात्र घाटंजी पोलिस स्टेशन याला काही महिन्यांपासून अपवाद ठरत आहे. अवैध धंदे, अवैध प्रवाशी वाहतूक यावर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याने जणूकाही पोलिसांचा वचक लोप पावला की काय? असे चित्र निर्माण झाल्याने जनतेत घाटंजी पोलीसाप्रती रोष व्यक्त केल्या जात आहे.
घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांच्या नंतर येथिल या पोलीस स्टेशनचे कारोभार प्रभारावर होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी कायम स्वरुपी ठाणेदार प्राप्त झाल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अवैध धंदे अवैध दारू विक्रीसह लगाम लागेल मात्र त्या आशा हवेतच विरल्या गेल्यात. शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू भरमसाठ प्रमाणात विकल्या जात आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर पडत आहे. चार दिवसांपूर्वीच एक दारूची घटना शोषल मीडियावर वायरल झाली होती. यात एका सामाजिक संघटनेच्या तालुका अध्यक्ष यांनी त्या गावाच्या पोलीस पाटलाला फोन वरून जॉब विचारला होता. एवढेच नव्हे तर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मटका चालविला जातो. ही बाब घाटंजी पोलिसांच्या नजरेस पडत नसावी काय हे एक कोड निर्माण झाले आहे. घाटंजी शहरात कोणत्याही रस्त्याने फिरा सैदव प्रवाशांची कोंडी झालेली आढळेल याला पांगविण्यासाठी कोणताच पोलीस कर्मचारी येताना दिसत नाही त्यामुळे प्रवाशी व ग्रामीण भागातून आलेल्या जनतेला नाहक त्रास सहन करावे लागते. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन स्तरावरील वाहतूक पोलीस बंद केले असले तरी एक खाकी वर्दीतील पोलीस प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूकदाराजवळ जावून त्यांच्याशी काय व्यवहार करतो ही बाब सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. येथिल व्यवस्थेवर घाटंजी पोलिसांचे दुर्लक्ष का? असा सवाल जनतेतून होत असून जिल्हाधिकारी साहेबांनी येथिल प्रकारावर लक्ष देवून जनतेला सुरक्षित करावे अशी मागणी जोर धरत आहे.
