Home महाराष्ट्र किनवट शिक्षण संस्था सदस्यपदी निवड झाल्याने संध्याताई राठोड यांचा सत्कार

किनवट शिक्षण संस्था सदस्यपदी निवड झाल्याने संध्याताई राठोड यांचा सत्कार

10

किनवट प्रतिनिधी

किनवट शिक्षण संस्था सदस्यपदी निवड झाल्याने संध्याताई राठोड यांचा सत्कार

किनवट शिक्षण संस्था किनवट च्या सदस्यपदी नुकतेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संध्याताई प्रफुल राठोड यांची निवड झाल्याने बळीराम पाटील महाविद्यालय किनवट च्या वतीने महाविद्यालयात दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवराज बेंबरेकर उपप्राचार्य डॉ,गजानन वानखेडे, कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र धात्रक ,प्रा. राजकुमार नेमानीवार आदी उपस्तीत होते. नवनिर्वाचित सदस्य सौ.संध्याताई राठोड सत्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात म्हनाल्या की या भागाचे माजी आमदार ,खासदार,मंत्री उत्तमरावजी राठोड यांनी ज्या उद्देशाने महाविद्यालयाची स्थापना केली ते उद्देश साध्य करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू किनवट शिक्षण संस्थेत सेवा करण्याची संधी मिळाली निश्चितच संधीच सोनं करून महिला व मुलीचे प्रश्न समजुन घेऊन महिला व मुलींसाठी भविष्यामध्ये विकासात्मक कार्य करू असे त्या आपल्या भाषणात बोलतांना म्हणाल्या. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने इंग्रजी विभागाच्या प्रा.ममता जोनपेलिवार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रमुख प्रा. शिवदास बोकडे यांनी संध्याताई राठोड यांचा पुष्पगुच्छ ,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला . या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या महिला प्राध्यापिका प्रज्ञा घोडवाडीकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिल्याने त्यांचाही याठिकाणी पुष्पगुच्छ देऊन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड यांनी सत्कार केला याप्रसंगी रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने, प्रा.पुरूषोत्तम यरडलावार, महीला कार्यक्रम आधिकारी सुलोचना जाधव,डॉ एस.आर शिंदे, प्रा विजय खुपसे, ग्रंथालय विभाग प्रमुख मंदाकिनी राठोड,वानिज्य विभागाच्या डॉ शुभांगी दिवे, प्रा.अम्रपाली हाटकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इतिहास विभाग प्रमुख प्रा.किशन मिराशे यांनी केले.

Copyright ©