कार्यकारी संपादक राजू चव्हाण
घाटंजी पंचायत समितीने काढलेली ई निविदा नियमबाह्य
——————————————–
ई निविदा रद्द करण्यासाठी पं. स. व जि. प. सदस्याचे लेखी तक्रार
——————————————–
घाटंजी- पंचायत समिती अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाची ई निविदा काढण्यात आली. ती सुट्टीच्या दिवशी व काही शासकीय निकष डावलून केल्याने ती निविदा तात्काळ रद्द करावी अश्या आशयाचे निवेदन पंचायत समिती सदस्य व जि. प. सदस्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
१५ व्या वित्त आयोग मधून ई खुली निविदा दिनांक १३ नोव्हेंबर रोज शनिवारला आर ओ विथ कुलिंग मशिन साठी काढण्यात आली असून अंतिम तारीख १७ नोव्हेंबर ठेवण्यात आले. या निवेदेची एकूण किंमत तिस लाख असे आहे. ही निविदा काढताना आपल्या मर्जीतील कंत्राटदारालाच हे काम मिळावे हा हेतू पुढे ठेवून अनेक शासकीय नियमाला डावलून ही निविदा काढल्याचा आरोप होत आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य यांनी गट विकास अधिकारी यांना या समितीचे सचिव कोण असे विचारणा केली असता पाणी पुरवठाचे उपअभियंता असल्याचे सांगण्यात आले. त्यांना विचारले असता त्यांनी गट विकास अधिकारी हेच असल्याचे सांगितले हा सारा खेलखंडोबा सुरू असून त्यांनी उचित माहिती न दिल्याचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करणाऱ्यांनाच या ठिकाणी माहिती मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असा सवाल या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत असून या समितीचे सचिव कोण हा विषय आजही सभ्रमात आहे. ही निविदा काढल्यानंतर या निविदेत तालुकास्तरीय समितीच्या अध्यक्ष व सचिव यांचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने यात आपल्या सोयीच्या कंत्राटदाराला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा एक घाट असल्याचा सुध्दा आरोप केला आहे. सोबतच सदर ई निविदा फी व इसारा रक्कम घाटंजी पंचायत समिती खात्यात जमा करण्याचे कळविले आहे. मात्र खाते क्रमांक, आयफएससी कोड, बँकेचे नावाचे ठिकाण रिक्त ठेवले आहे. याबाबत काही कंत्राटदारांनी विचारले असता प्रत्यक्ष पंचायत समिती कार्यालयात येवून घ्या असे सांगितल्या गेल्याचे म्हणणे आहे. मग दूरवरील कंत्राटदार कसे निविदा भरणार हा एक संशोधनाचा विषय असून यावरून आपल्या जवळील कंत्राटदाराला, कंपनीला, पुरवठा दाराला ही निविदा मिळावी हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे यातून उपलब्ध होणाऱ्या साहित्याची दर्जा कशी राहील याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे नियमबाह्य काढलेली ही ई निविदा रद्द करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य आशिष लोणकर, सौ. सरिता मोहन जाधव, सौ. पावणी रुपेश कल्यमवार, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे, सौ. नयना जिवन मुद्देलवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे निवेदन देऊन केली आहे.
