झाडावरून पडून मृत्यू
येथील राजु अलोने वय 45 हा जंगलात काड्या आणण्यास दि.16 नोव्हेंबर दुपारी 3 वाजताच्या दरम्यान गेला असता झाडावरील संतुलन गेल्याने वरुन खाली पडला यातच त्याचा जागेवर मृत्यू झाला आज दुपारला म्हशी चारण्या करीता गेलेले गुराख्यास दिसून आला या घटने वरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यांनी या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस घटनेची चौकशी करीत असुन तूर्तास अकस्मात मृतिव् ची नोंद करण्यात आली आहे राजु अलोन यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे यांच्या मृत्यू ने हळहळ वेक्त करण्यात येत आहे



