Home यवतमाळ धिरज किचन मराठी चॅनलच्या माध्यमातून घरोघरी पोहचतेय आपले वैदर्भिय पदार्थ

धिरज किचन मराठी चॅनलच्या माध्यमातून घरोघरी पोहचतेय आपले वैदर्भिय पदार्थ

10

आकोली प्रतिनिधी सचिन चावरे

धिरज किचन मराठी चॅनलच्या माध्यमातून घरोघरी पोहचतेय आपले वैदर्भिय पदार्थ

मराठी बोलीभाषेची अनेक रूप आहेत तशीच इथल्या खाद्यसंस्कृतीतही तेवडीच विविधता आहे. मग तो विदर्भातील भाज्यांमध्ये होणारा तेलाचा वापर असो की कोंकणी पद्धतीत होणारा खोबर्‍याचा वापर असो की मग खांदेशातील शेंगदाण्याचा कुटाचा वापर .
खास महाराष्ट्रातील आणि विशेष करून वर्‍हाडी व वैदर्भिय खाद्य संस्कृतीचा वारसा जपणारं आपल मराठमोळ किचन म्हणजेच धिरज किचन.
धिरज किचन मराठी या विविध खाद्यपदार्थांच्या रेसीपी बद्दल असलेल्या धिरज पोकळे यांचे मराठी चॅनल आहे.धिरज पोकळे हा वर्धा जिल्यातिल,सुकळि( बाई ) या छोट्याश्या गावतील रहिवाशी आहे. धीरज किचन मराठी चैनलला ३१ डिसेंबर २०२१ ला ३ वर्षे पूर्ण होत आहे. सध्या त्यांच्या चॅनल ला ३५७,६२३ सबस्क्रायबर्स असून त्यांचे व्हिडिओ तब्बल ४१,८१६,९९९ वेळा पाहिले गेले आहेत. या चॅनलला यूट्यूब कडून सिल्वर प्ले बटन सुद्धा देण्यात आलं आहे.
धिरज हा मूळचा वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई या गावचा. धिरज हा पेशाने इंजीनियर असून पुण्याच्या नावांकीत मल्टी नॅशनल कंपनीत कार्यरत आहे. सोमवार ते शुक्रवार आपला जॉब सांभाळून शनिवार रविवार सुट्टी असते व या दोन दिवसात तो आपल्या यूट्यूब चॅनल वर काम करत असतो.
लहानपपणा पासूनच स्वयंपाकाची आवड असल्याने व शिक्षणासाठी नेहमी बाहेर राहावं लागल्यामुळे बाहेरच खाण्यापेक्षा स्वतः बनवून घरचा जेवणाचा आस्वाद घेणे हे धिरजला अधीक पसंद आहे व याच कारणामुळे तो जिथे ही राहिला तिथे स्वतःहाचे जेवण स्वतः बनवून खात असे.आपली ही पाककलेची आवड पुढे जोपासण्यासाठी त्याने १ जानेवारी २०१९ ला आपले धिरज किचन मराठी या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केले व आठवड्यातून फक्त शनिवार रविवारच मिळत असल्याने या दोन दिवसात स्वतः रेसीपी शूट आणि एडिट करून दर रविवारी रोज नवीन पाककृती तो शेअर करायला लागला. धिरज हा मन मिळाळू व शान्त स्वभावाचा असुन त्याच्यामधे कलात्मक गुन मोट्या प्रमाणात आहे.धिरज हा विदर्भातील असून खास करून आपले पारंपरिक विस्मुरनात गेलेले वैदर्भीय पदार्थ तो शेअर करायला लागला व अस्सल वर्‍हाडी पदार्थ या अगोदर यूट्यूब वर नसल्याने धिरज किचन मराठी या चॅनल च्या वर्‍हाडी रेसिपीज ला वैदर्भिय लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला . यूट्यूब कडून अवॉर्ड सुद्धा भेटला. विदर्भातील खास पदार्थ जसे कढीगोळे, डाळभाजी, आलू वांग्याची भाजी,रोडगे ,उकडपेंडी,तर्री पोहे ,सांभर वडी ,सावजी पदार्थ ,पाटावडी,सरगुंडे ,आलू बोंडा अशे अनेक पदार्थ त्याने चॅनल वर शेअर केलेले आहेत व त्याला भरपूर प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. फक्त मराठीच नाही तर इतर पर प्रांतीय पदार्थ जसे की खमण ढोकळा ,बाकरवडी ,मटार पनीर , पालक पनीर या रेसिपीज सुद्धा त्याचा शैलीत शेअर केल्या आहेत व त्याला सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे . बरसशे सबस्क्रायबर्स त्याचे हे पदार्थ घरी बनवून त्याबद्दल त्याचे आभार मानत असतात.

Copyright ©