Home यवतमाळ नक्षलग्रस्त भत्त्यापासून पोलीस प्रशासन वंचित

नक्षलग्रस्त भत्त्यापासून पोलीस प्रशासन वंचित

26

वणी प्रतिनिधी निलेश चौधरी

नक्षलग्रस्त भत्त्यापासून पोलीस प्रशासन वंचित

नक्षलग्रस्त भत्ता मिळत नसल्यामुळे ,पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर

महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत तालुक्यातील राजुर (काॅ) येथील नक्षलवाद्यांचा समावेश

नक्षलग्रस्त भत्त्यापासून तालुक्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी वंचित असून या पोलीस कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर व्यक्‍त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना भत्ता मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. वणी तालुका हा नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असुन, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्ता मिळत आहे. परंतु वणी, शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत नक्षलग्रस्त कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे,मागील १० ते १५ वर्षांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच (शनिवार १३ नोव्हें.) रोजी महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर ,पोलीस व नक्षलवादी यांच्या झालेल्या चकमकीत, २६ नक्षलवादी ठार करण्यात आहे होते. या ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये ,वणी तालुक्यातील राजुर (काॅ) येथील, मिलिंद तेलतुंबडे यांचा सुध्दा समावेश असल्याची माहीती हाती आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या नक्षलग्रस्त कार्यवाहीचा आलेख पाहुन ,पोलीस कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्ता लवकरात लवकर लागु करावा असे पोलीस कर्मचाऱ्यांमधुन बोलले जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांना २०१६ पासून
नक्षलग्रस्त भत्ता लागू करण्यात आला. आणी अधिकाऱ्यांना एरिए्ससुद्धा मिळाले. परंतु यातून मात्र पोलीस कर्मचारी वंचित राहीला आहे. नक्षलग्रस्त भागात काम करूनही या पोलीस कर्मचाऱ्यांना साधा नक्षलग्रस्त भत्ता मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर व्यक्‍त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येवर लक्ष देऊन या कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्ता देण्यात यावा, अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

Copyright ©