Home यवतमाळ राष्ट्रीय निसर्गोपचार जागरूकता दिवशी जीर्णरोग निर्मूलन आरोग्य शिबीराचे आयोजन !

राष्ट्रीय निसर्गोपचार जागरूकता दिवशी जीर्णरोग निर्मूलन आरोग्य शिबीराचे आयोजन !

25

राष्ट्रीय निसर्गोपचार जागरूकता दिवशी जीर्णरोग निर्मूलन आरोग्य शिबीराचे आयोजन !

निसर्गोपचार अवलंबन सुदृढ आरोग्य व जीर्णरोग निवारण मुक्ती काळाची गरज डॉ. विश्वास

यवतमाळ. गुरुवार दिनाक: १८ नोव्हेंबर२०२१,४ थे राष्ट्रीय निसर्गोपचार जनोत्सव दिवस आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अनुषंगाने आरोग्य युक्त रोग मुक्त-निरोगी भारत अभियान, आयुष मंत्रालय भारत सरकार अंतर्गत INO सदस्य तर्फे सुदृढ आरोग्य चळवळीला गती देण्यात आयुष निसर्गोपचार चिकित्सकांच स्नेह मिलन, प्रचार प्रसार जनजागरण, वसंत ऋतू शरीर शुध्दी दुशपरिणाम विरहीत, निसर्गोपचार एक आरोग्यदायी जीवनपध्दती यांचे संवर्धन, सर्वाधीन आरोग्य कौशल्य विकास काळातील गरज, याकरिता दोन दिवस विशेष आरोग्य शिबीर आयोजित केले आहे स्थळ चाँदसी अर्शकल्प आरोग्य केंद्र, माईदे चौक, विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ येथे वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सेवा करण्यात येईल.

या शिबीराचे उद्देश सामाजिक आरोग्यन्नतीसाठी विविध उपचाराने निराश, पिडित आरोग्य लाभार्थी बंधू भगिनींना कायम स्वरुपी उपचाराचा लाभ घेता यावा, संपूर्ण आरोग्य विषयी प्रश्न उत्तर माध्यमातून शंका निरशन केलेल्या जातील, जीर्णरोग मुळव्याध, भगंदर, फिशर, अंडकोष वृद्धी (हायड्रोसिल) तसेच कोटबद्धता, त्वचा विकार, संधीवात, गुप्तरोग इत्यादी निवारण व रोगमुक्तीसाठी तपासणी, उपचार व योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. आधुनिक जीवन शैली मुळे विविध प्रकारच्या आजार, पीडितांना मानसिक आधार, मनोबल वाढविण्यासह ताणतणाव संतुलन सुदुढ आरोग्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वृध्दी आणि इम्यूनिटी बुस्त हाच एकमेव उपाय . आरोग्यदायी योग, आयुर्वेद निसर्गोपचार ,आहार व अचूक नूस्खे मार्गदर्शक चिकित्सक रत्न पुरस्कार प्राप्त डॉ. रंजन कुमार विश्वास सह सत्वचिकित्सक अंगद राजाभोज

तसेच आमचे प्रकल्प स्नेही आरोग्य सेवा योग व निसर्गोपचार सत्वचिकित्सा समिती यवतमाळ जिल्हा संलग्न INO आणि प्रमुख संयोजक डॉ. विश्वास मित्र परिवार तर्फे दुपारी १ वाजता ४ थे राष्ट्रीय निसर्गोपचार महोत्सव दिवस पर्व सह ठिकठिकाणी अशा प्रकारचे शिबीरे घेण्यासाठी नियोजन करण्यात येईल. तरी आपली सहकुटुंब, इष्टमित्रांसह आरोग्य लाभार्थीनी सहभागी होऊन सेवेचा लाभ घ्यावा.

घरोघरी, गावोगावी आरोग्याचा मुळ आधार निसर्गोपचार निरोगी जीवनाचा साक्षात्काराचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात येते आहे. सर्वश्री डॉ. आशिष देशपांडे (अध्यक्ष), डॉ. अंगद राजाभोज (सचिव), डॉ. रंजनकुमार विश्वास (समन्वयक), डॉ. बाबासाहेब कपिले (मेन्टर), यांचे सह डॉ. मिलींद महाजन, डॉ. मधुकर सोनटक्के, डॉ. विनोद उबाळकर, डॉ. देवानंद खरे, डॉ. प्रिया बन्सोड, डॉ. संगिता सरोदे (पर्वेकश्क ) व योगमित्र श्री संतोष निंबाळकर, रामजी अजमिरे, खुशाल जळेकर, श्रीकांत मुंगीलवार, रमेश राउत, राजु कावेरी, राजेश बोरूंदीया, मोहन ठाकरे, गजानन शिरभाते, निलेश राजगुरे, सुधीर राठोड, सर्वेश अग्रवाल, विजय धनविजय ,सौ. उत्पला विलास वासनिक, सौ. वर्षा गजानन भासपाले, सौ. वंदना गुप्ता, व सौ. पुजा विश्वास आदि असून शिबीरासाठी लाभार्थ्यांनी नोंदणी आरोग्य मित्र दूत समन्वयक डॉ. रंजनकुमार विश्वास यांचे फोन नं. ९४०५४९४०९५ या नंबरवर संपर्क करून अधिकाधिक लाभ घ्यावा असे माहितीपत्रक आयोजक व श्री क्रांती कुमार आलोने ( प्रसिध्दी प्रमुख) तर्फे कळविण्यात आले.

Copyright ©