Home यवतमाळ अवैध देशी दारूची विक्री वर टाकला छापा 

अवैध देशी दारूची विक्री वर टाकला छापा 

26

सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान

अवैध देशी दारूची विक्री वर टाकला छापा 

सावळी सदोबा:-पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील एका गावामध्ये अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या‌आरोपीवर पारवा पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले असुन,ही कारवाई दिनांक १४/११/२०२१ दुपारी दोन वाजता च्या सुमारास करण्यात आली,तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवैद्य देशी दारूची विक्री करणार्या आरोपी विरुद्ध पारवा पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम हाती घेतली असून,पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये,पोलीस अमलदार गणेश राठोड,हेमंतसिंग राठोड, संदीप महाजन,अनिल गिनगोले, यांनी दिनांक १४/११/२०२१ रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पारवा पोलीस स्टेशन हद्दीतील सावळी सदोबा परिसरातील चातारी या गावांमध्ये आरोपी अनिल रघुनाथ शिंदे वय २८ वर्ष हा अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत होता,यावेळी त्यांच्याकडून ११६ बॉटल ज्यांची किंमत ४०६० हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आले,याप्रकरणी अनिल शिंदे यावर पोलीस स्टेशन पारवा येथे गुन्हा दाखल करण्यात आला….

Copyright ©