Home यवतमाळ परिवर्तन विकास आघाडीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा

परिवर्तन विकास आघाडीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा

26

संपादक सदानंद जाधव

परिवर्तन विकास आघाडीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा

एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांनी सद्या राज्यात संप पुकारला आहे. दिग्रस येथील एसटी महामंडळाच्या पीडित कर्मचाऱ्यांनी देखील या संपात आपला जोरदार सहभाग नोंदवला आहे.या संपाला आपला जाहीर पाठिंबा देत परिवर्तन विकास आघाडीने आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी दिग्रस तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करून या संपाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
भारतीय संविधानात कल्याणकारी राज्याची संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवून सर्व जनतेचे हित जोपासावे. कुणावर अन्याय होऊ नये,यावर कटाक्ष आहे.पण ही संकल्पना मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत उपरी ठरत आहे. राज्य शासनाच्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा योग्य असा मोबदला मिळाला पाहिजे,अशी महत्वपूर्ण मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने केली आहे. तसेच कामगार करारानुसार कर्मचाऱ्यांना सर्व फायदे त्वरित मिळावे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात.
एसटीला राज्याची लालपरी,राज्याची जीवनवाहिनी म्हणूनही संबोधले जाते.राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनाच्या सेवेत विलगीकरण करून जीवन वाहिनीला जीवन दान द्यावे व तमाम कर्मचाऱ्यांची फरफट कमी होऊन त्यांच्या समवेत त्यांच्या कुटुंबियांना न्याय देऊन उपकृत करावे.व हा संप तात्काळ निकाली काढून सर्व प्रवासी जनतेचे कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी जोरदार मागणी परिवर्तन विकास आघाडीचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनचे शासकीय कर्मचारी म्हणून विलगीकरन झालेच पाहिजे, संजय देशमुख तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अश्या विविध घोषणा बाजीने बस स्टेशन परिसर दुमदुमला होता

Copyright ©