Home यवतमाळ विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून संतोष ढवळे यांना वैद्यकीय महाविद्यालयात नो एंट्री

विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून संतोष ढवळे यांना वैद्यकीय महाविद्यालयात नो एंट्री

23

विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून संतोष ढवळे यांना वैद्यकीय महाविद्यालयात नो एंट्री
———————————————
जिल्हा पोलिस अधीक्षकांचे शिकाऊ डॉक्टरांना आश्वासन 
———————————————.
यवतमाळ- १० नोव्हेंबर २०२१ रोजी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी संप पुकारत आंदोलन करीत होते. या आंदोलनातील सहभागी आंदोलनकर्त्यांना सहानुभूती देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती. मात्र अशातच सामाजिक कार्यकर्ते संतोष ढवळे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती त्यांच्या भावना दुखावेल असे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांचा निषेध करीत आंदोलनातील विद्यार्थी चांगलेच भडकून संतोष ढवळे मुर्दाबाद असा नारा देत आंदोलनाची तीव्रता वाढवली अशातच परिस्थीची स्थिती जाणून संतोष ढवळे यांना वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नो एन्ट्री आदेश बजावू असे आश्र्वाशित करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
शिकाऊ डॉक्टर अशोक पाल यांच्या खुनामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या खुनातील आरोपीला ताब्यात घेण्यावरून यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात स्थानिक नेत्यांसह संतोष ढवळे ही आले. मात्र त्यांनी सहानुभूती देण्यापेक्षा येथिल शिकाऊ डॉक्टरांना एकेरी भाषेत बोलून त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर ते राजकिय दबाव तंत्राचा अवलंब करून तडाक्याची भाषा वापरतात. त्यांनी यापूर्वीअनेकदा या ठिकाणी गोंधळ घातला आहे. असाही आरोप असून या ठिकाणी आम्ही वैद्यकीय शिक्षण घेत असून आमच्या घरच्या पैश्याने शिक्षण घेत आहे. संतोष ढवळे यांच्या पैश्याने नव्हे, त्यामुळे त्यांचा दबाव आमच्यावर कशासाठी अश्या एक ना अनेक तक्रारी या निमित्ताने येथिल शिकाऊ डॉक्टर विद्यार्थ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पुढे मांडल्या येथिल शिकाऊ डॉक्टर आंदोलन करीत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या रुग्णाची सेवा दोन दिवसापासून कोलमडली होती. विशेष गरीब रुग्णांचे जास्त प्रमाणात हाल झाले. त्यामुळे येथिल आरोग्य सेवा सुरळीत व्हावी. आणि आंदोलनात सहभागी होवून आंदोलन करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरच्या भावना दुखावणारे वक्त्यव्य करणाऱ्या संतोष ढवळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणि त्यांना वैद्यकिय महाविद्यालय परिसरात प्रवेशास बंदी घालण्यात येईल व ते परिसरात आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी शिकावू डॉक्टर आंदोलन कर्त्याना दिले.

Copyright ©