श्रीवसतंराव नाईक वैद्यकीय महाविद्यालच्या माझी विद्यार्थ्यांचा व खाजगी डॉक्टरांचा आंदोलनाला पाठिंबा
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय येथे शिकाऊ डॉक्टरांची हत्या झाली त्या निषेधार्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी कालपासुनआंदोलन सुरू केले आहे या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असुन या घटनेचा निषेध नोंदवला आहे या वेळी अशोक कुमार पाल यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी कॉलेजच्या माजी विद्यार्थी तसेच खाजगी डॉक्टरांनी या आंदोलना दरम्यान केली हि घटना गंभीर असल्याने माझी विद्यार्थी तसेच डॉक्टर यांनी पाठिंबा दर्शविला या मध्ये डॉ निशांत चव्हाण,सचिन बेले, डॉ सतीश चिरडे, डॉ. पियुष बरलोटा, डॉ. विकास येडशीकर , डॉ. स्वप्नील मानकर डॉ. रमा बाजोरिया डॉ. रुपेश बावणे डॉ.गजानन मस्के डॉ अर्चना मस्के डॉ. स्मिता चव्हाण डॉ. अरुण जनबंधू डॉ. शरद राखुंडे डॉ. चंद्रशेखर धूर्वे डॉ प्रफुल्ल मसराम, डॉ. वैभव फड,डॉ. नाझिया काझी डॉ. शीतल मानकर, डॉ. सौद देशमुख , यांनी आंदोलन स्थळांना भेट देऊन दिवंगत विद्यार्थी डॉ. अशोक पाल याला श्रद्धांजली वाहिली, तसेच कॉलेजच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी जे यवतमाळ च्या बाहेर देशात सर्वत्र कार्यरत आहे अशा काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवेदना व्यक्त करून आंदोलनास पाठिंबा जाहीर केला ज्यामध्ये डॉ. अतुल फुलझेले आय.पी.एस. कमिशनर ऑफ पोलीस हिमाचल प्रदेश, डॉ. विनय राठोड डी.सी.पी. ठाणे ,डॉ उपसेन बोरकर कमिशनर आयकर विभाग नागपूर याचां समावेश आहे
जिल्ह्यात कलम 37 नुसार जमावबंदी आदेश लागू
यवतमाळ दि. 12 नोव्हेंबर : जिल्ह्यामध्ये विविध कारणास्तव निदर्शने, मोर्चा व आंदोलनाची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर आदेश दि. 15 नोव्हेंबर 2021 चे मध्यरात्री पासून तर 30 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.
या आदेशान्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, जमा करून ठेवता येणार नाहीत किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करता येणार नाही.
सदर आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी तसेच विवाह, अंत्ययात्रा, सक्षम अधिकारी यांनी विशेष परवानगी दिलेले मिरवणूक व कार्यक्रम यांना लागू राहणार नाही.
____________________________
आदिवासी वसतीगृह प्रवेशाकरिता अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि. 12 नोव्हेंबर : आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह दारव्हा येथे सन 2021-22 करिता प्रवेशाकरिता वर्ग सातवी, दहावी व बारावी पास अनुसूचित जमातीच्या विद्यार्थीनींकडून https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
दारव्हा येथील वसतीगृहाची क्षमता 125 असून विद्यार्थी ही अनुसूचित जमातीची असावी, वसतीगृहात विद्यार्थिनिंना निशुल्क उत्तम राहण्याची व भोजनाची व्यवस्था, निर्वाह भत्ता व इतर सुख-सुविधा पुरविण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे डि.बी.टी. द्वारे रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. तरी इच्छुक विद्यार्थिनिंनी सन 2021-22 करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन गृहपाल आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, दारव्हा, यांनी केले आहे.
