Home यवतमाळ वयोवृद्ध विधवा महिलेला न्याह न मिळाल्याच व दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास...

वयोवृद्ध विधवा महिलेला न्याह न मिळाल्याच व दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास प्रहार करणार तीव्र आंदोलन

31

——————————————–
जोडमोहा सरपंचाच्या पतीने वृध्द महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत राहते घर पाडले
———————————————
प्रहारने दखल घेऊन कळंब तहसीलदार यांना दिले निवेदन
————————–——————–
वयोवृद्ध विधवा महिलेला न्याह न मिळाल्याच व दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास प्रहार करणार तीव्र आंदोलन
———————————————-
कळंब तालुक्यात येत असलेल्या जोडमोहा येथिल ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ७० वर्षीय कोलाम समाजातील वृध्द महिला पार्वता चंद्रभान मराठे हीचा राजकीय द्वेषातून महिला सरपंच असताना तिचे पती ग्राम पंचायतीचे सर्व अधिकार हातात घेवून बेकायदेशीर काही समाज कंठकाना सोबत घेऊन जातीवाचक शिवीगाळ करीत राहते घर पाडले व त्यावरील टिनपत्रे जमीनदोस्त केले. याबाबत ग्रामीण पोलिस स्टेशन कळवून सुध्दा त्यांनी दखल न घेतल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून न्यायाची मागणी करीत दोषी सरपंच पती व त्यांच्या सोबत असलेले काही समाज कंठकावर कारवाई ची मागणी केली आहे.
आदिवासी कोलाम समाजातील वृध्द महिला पार्वता चंद्रभान मराठे हिला वारंवार मानसिक त्रास देणे तिच्याकडे जागेचा रितसर आठ अ असून ती ग्राम पंचायतीचे सर्व कर भरत असताना तिला अतिक्रमित जागेवर वास्तव्याचे कारण पुढे करून तिला मानसिक त्रास सुरू असून समाज कंठक गैरअर्जदार वासुदेव मुरकुटे,व त्यांचे साथीदार यांनी तिच्या घरी जावून जातीवाचक शिवीगाळ करीत तिचे राहते घर पाडले. आणि घरावरील टीनपत्रे जमीनदोस्त केले. यात ही वृध्द महिला उघड्यावर आली त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला समधीत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा प्रहार संघटने कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी कळंब तालुका अध्यक्ष दिलीप डवरे,उपतालुका प्रमुख बंडू भाऊ वाघाडे, मंगेश मेश्राम, प्रविण ढाकुलकर जोडमोहा ग्रामपंचायत सदस्य कवडू चौधरी,मोरे सर, दिलीप मलांडे, संजय घोटेकर,बळीचंद्र लोणकर, संतोष घोटेकर, शेखर महनकर,दिनेश खडकी, राजू टेकाम, सीताराम मेश्राम, कवडू रामगडे, शंकर मलांडे,केतन चौधरी,दत्ता बोरकर, रघुनाथ आत्राम, अशोक कासार, महादेव कासार,उपस्थित होते

Copyright ©