Home यवतमाळ डॉ.चंद्रशेखर देशपांडे वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष – भाजपा पदाधिका-यांकडून नियुक्ती

डॉ.चंद्रशेखर देशपांडे वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष – भाजपा पदाधिका-यांकडून नियुक्ती

30

डॉ.चंद्रशेखर देशपांडे वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष
– भाजपा पदाधिका-यांकडून नियुक्ती

यवतमाळ- यवतमाळ शहरातील समाजसेवी डॉ.चंद्रशेखर देशपांडे यांची नियुक्ती भाजपा वैद्यकीय आघाडीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्तांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा, यवतमाळचे आमदार मदनभाऊ येरावार, आमदार नामदेवराव ससाणे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून डॉ.चंद्रशेखर देशपांडे वैद्यकीय क्षेत्रात अविरतपणे सेवा देत आहेत. या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता, रूग्ण व नातेवाईक यांच्याशी असलेला सलोखा, सेवावर्ती भाव लक्षात घेवूनच ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीपत्रावर डॉ.चंदनराव पांडे, डॉ.अरविंद पवार, डॉ.अरविंद भुरे यांचे हस्ताक्षर आहेत.

Copyright ©