शिकाऊ डॉक्टरांच्या आंदोलनास रुग्णवाहिका संघटनेचा एक दिवसीय पाठिंबा
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय येथे शिकाऊ डॉक्टरांची हत्या झाली हि बाब अत्यंत निंदनीय असुन निषेधार्थ आहे त्याच अनुषंगाने घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाल यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा व अधिष्ठाता,जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी राजीनामा द्यावा या करीता नारेबाजी करीत कालपासुनआंदोलन सुरू केले आहे या आंदोलनास येथील खाजगी रुग्णवाहिका चालक मालक संघटनेने एक दिवसीय जाहीर पाठिंबा दिला असुन आज खाजगी रुग्ण वाहिका बंद ठेऊन निषेध नोंदवला आहे या वेळी अशोक कुमार पाल यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी रुग्णवाहिका संघटनेचे पुरुषत्तम कामठे,संतोष मेश्राम,मनोज लुटे,सागर राऊत,चंद्रशेखर लांडे,कुंदन सारसर,सुजित बोरकर,प्रकाश झाडे इत्यादींनी एका निवेदनद्वारे केली आहे,
