कार्यकारी संपादक राजू चव्हाण
एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास घाटंजी वंचित बहुजन आघाडी चा सक्रीय पाठिंबा
———————————————
घाटंजी- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस.टी. कर्माच्याऱ्यांचा संप चालू आहे. पांढरकवडा आगारामध्ये सुद्धा गेल्या 28 ऑक्टोबर पासून चालू असलेल्या संपला व त्यांची मुख्य न्याय मागणी राज्य परिवहन महामंडळाचे (एस.टी.) राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा या मागणीसाठी घाटंजी वंचित बहुजन आघाडी चा सक्रिय पाठिंबा देण्यात आला .
राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलगीकरण करावे आणी इतर मागण्या न्यायपूर्ण असून शासन याकडे हेतूपूरस्पर दुर्लक्ष करित आहे. तुटपुंज्या वेतनामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांना सामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक कामगारांनी मागील दिवसात आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. आणी आता न्याय मागणाऱ्या कामगारांवर गुन्हे दाखल करून, नोकरीतून निलंबित करण्याची प्रक्रिया सुरु आहे महाराष्ट्रातील ९१८ तर यवतमाळ जिल्ह्यातील १०२ कामगारांना निलंबित करण्यात आले हे अत्यंत निषेधार्य आहे .
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एस.टी. ओळखली जाते.ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासीवर्ग प्रवासासाठी एस.टी. वरच अवलंबून आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने आंदोलन कर्त्या समस्त आंदोलनकर्त्या कर्मचारी वर्गावरील निलंबनाची कार्यवाही त्वरित मागे घेऊन राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलगीकरण करावे आणी इतर मागण्या मान्य करून सामान्य जनतेला वेठीस धरू नये सामान्य जनतेचे हाल करू नये या करिता वंचित बहुजन आघाडी,तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ तर्फे न्याय मिळणे करिता शासनास कडे पाठपुरावा करण्यात येत असून, आपल्या संपूर्ण मागण्यास पाठींबा जाहीर करीत अहोत . पांढरकवडा येथील कर्मचारी आंदोलन स्थळी वंचित बहुजन आघाडी, घाटंजी चे तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या व्यथा , वेदना जाणून घेतल्या . या प्रसंगी यशपाल खाडे , शंकर गेडाम , रा. वि. नगराळे , गौरव शेंडे , सुरज रामटेके , दीक्षांत वासनिक , नितीन राठोड , साहिल रामटेके , सीताराम वाघ , तुकाराम कोरवते . व आंदोलन करते निमसरकार मॅडम , सरदार मॅडम , मोहूरले मॅडम , उईके मॅडम , लक्ष्मण आत्राम , विठ्ठल गेडाम , गुरुप्रसाद जुमनाके , गजानन चांदेकर , विनोद मार्कंडे , प्रकाश गेडाम , राजेंद्र सिडाम , महेश बसावार , जय मेश्राम , तिरांकर मॅडम हे आंदोलन करते उपस्तीत होते .
प्रतिक्रिया
‘’महाराष्ट्र शासनाने आंदोलन कर्त्या समस्त आंदोलनकर्त्या कर्मचारी वर्गावरील निलंबनाची कार्यवाही त्वरित मागे घेऊन राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलगीकरण करावे आणी इतर मागण्या मान्य करून सामान्य जनतेला वेठीस धरू नये सामान्य जनतेचे हाल करू नये अन्यता वंचित बहुजन आघाडी सुद्धा एस.टी.कर्मचार्यां सोबत रस्त्यावर उतरू संघपाल कांबळे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, घाटंजी ’’
