संपादक राजू चव्हाण
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पं.स. सभापती कडून दिवाळी भेट
दिग्रस पंचायत समितीच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना असलेला तोकडा पगार, त्या तोकड्या पगारात आपल्या पाल्यांचे शिक्षणाचा खर्च व घरगाडा अगदी कसरतीने चालवावा लागतो. त्यामुळे दिग्रस पंचायत समितीच्या सभापती सौ. अनिता दिवाकर राठोड यांनी दिवाळीचे औचित्य साधून पंचायत समितीमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना भेट म्हणून लक्ष्मीमातेचा फोटो व मिठाईचे वाटप करण्यात आले.
पंचायत समितीच्या सभापती सौ.अनिता दिवाकर राठोड, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, माजी जि. प.सदस्य दिवाकर राठोड व मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना भेट वस्तू वाटप करण्यात आले. दिवाळीनिमित्त पंचायत समिती कार्यालयात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सभापती अनिता राठोड यांनी कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
—————————————-
दिवाळीनिमित्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या घरी सुख, समृद्ध आणि भरभराटी येवो,हीच भेट म्हणून लक्ष्मीमातेचा फोटो देण्यामागचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया पं.स. सभापती सौ.अनिता दिवाकर राठोड यांनी यावेळी दिली.
