Home यवतमाळ भांबोरा येथे विविध क्षेत्रातील निवडवतांचे भव्य सत्कार सोहळा संपन्न

भांबोरा येथे विविध क्षेत्रातील निवडवतांचे भव्य सत्कार सोहळा संपन्न

30

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

भांबोरा येथे विविध क्षेत्रातील निवडवतांचे भव्य सत्कार सोहळा संपन्न
———————————————
घाटंजी- तालुक्यातील भांबोरा येथिल रहिवासी सध्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विजय महादेव पवार यांनी आर्वी शिक्षक, कर्मचारी पतसंस्था निवडणूक लढविली यात त्यांनी भरघोस मतदान मिळवून विजय मिळवला सोबतच मातृत्व दीव्यांग सेनेच्या राष्ट्रीय सचिव व जिल्हा अध्यक्ष पदी संतोष दशरथ राठोड यांची निवड झाली आहे या सुवर्ण संधीचे औचित्य साधून भांबोरा येथिल मिलिंदभाऊ चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचा सोहळा आयोजीत करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
भांबोरा येथिल बाहेरगावी नोकरीला असलेले सर्वत्र कर्मचारी दिवाळी सणाला गावात प्रगट होण्याची परंपरा आजही जोपासली जाते. त्यानुसार आपला बांधव बाहेर गावात जावून सेवा बजावित इतरही क्षेत्रात गावाचे नाव झलकवित असतात त्याशिवाय गावातील सामाजिक कार्यात कार्य करणाऱ्याचा कुठे निवड होत असेल त्यांचे मुळे गावाचे नाव लौकिक होते त्यामुळे त्यांचा कुठे तरी सन्मान व्हावा हा दृष्टीकोन पुढे ठेवून मिलिंद चव्हाण मित्र मंडळाकडून हा सत्कार सोहळा आयोजीत केला जातो. या दिवाळीत सर्वत्र एकत्र जमल्यानंतर आर्वी शिक्षक कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेले विजय पवार व संतोष राठोड यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मां जगदंबा अक्वा फिल्टर कमिटीचे देणगी दाते, सरपंच कुणाल राठोड, दिवाळी सनानिमित्त गावात आलेले सर्वत्र कर्मचारी ग्रुप, गावातील गणमान्य प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग तसेच मिलिंद चव्हाण मित्र मंडळ उपस्थित होते.

Copyright ©