Home Breaking News जोडमोहा येथिल सरपंचाच्या पतीने वृध्द महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत राहते घर पाडले 

जोडमोहा येथिल सरपंचाच्या पतीने वृध्द महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत राहते घर पाडले 

30

उपसंपादक पवन धोत्रे

जोडमोहा येथिल सरपंचाच्या पतीने वृध्द महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत राहते घर पाडले 
———————————————-
समाज कंठकाना सोबत घेऊन केली जातीवाचक शिवीगाळ
———————————————-
अन्यायग्रस्त महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली न्यायाची मागणी
———————————————-
यवतमाळ- जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येत असलेल्या जोडमोहा येथिल ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ७० वर्षीय कोलाम समाजातील वृध्द महिला पार्वता चंद्रभान मराठे हीचा राजकीय द्वेषातून महिला सरपंच असताना तिचे पती ग्राम पंचायतीचे सर्व अधिकार हातात घेवून बेकायदेशीर काही समाज कंठकाना सोबत घेऊन जातीवाचक शिवीगाळ करीत राहते घर पाडले व त्यावरील टिनपत्रे जमीनदोस्त केले. याबाबत ग्रामीण पोलिस स्टेशन कळवून सुध्दा त्यांनी दखल न घेतल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून न्यायाची मागणी करीत दोषी सरपंच पती व त्यांच्या सोबत असलेले काही समाज कंठकावर कारवाई ची मागणी केली आहे.
निवडणूक काळात आपल्या गटास मतदान केले नसल्याचा राग मनाशी बाळगून सरपंच महिला असताना त्यांचे अधिकार सर्व हातात घेवून बेकायदेशीरपणे आदिवासी कोलाम समाजातील वृध्द महिला पार्वता चंद्रभान मराठे हिला वारंवार मानसिक त्रास देणे, ती पन्नास वर्षांपासून वास्तव्यास असताना तिच्याकडे जागेचा रितसर आठ अ असून ती ग्राम पंचायतीचे सर्व कर भरत असताना तिला अतिक्रमित जागेवर वास्तव्याचे कारण पुढे करून तिला मानसिक त्रास देत दिनांक ८ नोव्हेंबर ला समाज कंठक गैरअर्जदार नारायण जाधव, वासुदेव मुरकुटे, पवन जाधव, सोनी राठोड, योगेश मानकर, सुमनबाई राजूरकर यांनी तिच्या घरी जावून कोलामे तू जास्त माजली काय?असे जातीवाचक शिवीगाळ करीत तिचे राहते घर पाडले. आणि घरावरील टीनपत्रे जमीनदोस्त केले. यात ही वृध्द महिला उघड्यावर आली असून कडाक्याच्या थंडीत कोठे सहारा शोधावा हा प्रश्न तिला पडला असून आपल्यावर एवढा अन्याय का? या विवंचनेत वावरणाऱ्या वृध्द महिला पार्वताने ग्रामीण पोलिस स्टेशन गाठले मात्र येथिल पोलिसांची सुध्दा कारवाई झाली नसल्याने या वृध्द महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून रितसर निवेदन सादर करून आपल्याला जातीवाचक दिलेल्या शिवीगाळ व घर पाडून उघड्यावर आणले ही बाब तक्रारीत नमूद करून न्यायाची मागणी केली असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला पुष्टी देत बहुतांशी गावकऱ्यांनी त्यांच्या निवेदनावर सह्या करून या आदिवासी वृध्द महिलेस न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

Copyright ©