संपादक सदानंद जाधव
दिग्रस येथे दोन गटात तुंबळ हाणामारीने
शहराला लाभले पोलीस छावणी चे स्वरूप
दिग्रस शहराचे श्रध्येय महान तपस्वी संत श्री घंटीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रेत ८ नोव्हेंबरला रात्री१० वाजताचे सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारीने चांगलीच खळबळ उडाली.
यात्रेचा मुख्य परिसर, स्थानिक वाल्मिक नगरात झालेली हाणामारी नेमकी का झाली, कश्यावरुन झाली हे कळण्यापुर्वी हाणामारीचे रुपांतर चक्क दगडफेक व उभ्या मोटार सायकलची तोडफोड जाळपोळ पर्यंत गेल्याने पारंपरिक यात्रेला गालबोट लागले असून शहरात चांगलीच दहशत निर्माण झाली.
येथील वाल्मिक नगरातील रंजना सरसिया या महिलेने मो.आबीद मो.अफजल व दानिश बेग कामिन बेग यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या दोघांनी आपल्या बरोबर शेकडो युवकांना घेऊन राडा घातल्याचे सांगीतले आहे.हातात शस्त्र घेऊन यात्रेत धुमाकूळ घालत मेहतर समाजाच्या घरांवर दगडफेक केली, यांच्या घरापुढे उभ्या असलेल्या दुचाकी वाहणांची तोडफोड करित काही दुचाकी जाळून अश्लील भाषेत शिविगाळ केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेला धरुनच सलमान खान सलिम खान याने सुधा पोलिस ठाण्यात तक्रार देत वाल्मिक नगरातील सरसिया परिवारातील राज, रोहण, ध्रुव, नेहाल तसेच विक्की कलोसे,शक्ती सोनवाल यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.या हाणामारीत गंभीर जखमी झालेला एक नागपूर तर दुसरा यवतमाळ येथे उपचार घेत आहे.दिग्रस पोलिसांनी दुखापती करणे अंतर्गत व अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरु केला आहे, दरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी अती शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेलकर यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात टिय्या देऊन प्रकरणाची चौकशी केली आहे.
—————————————-
यात्रेत झालेल्या हाणामारी प्रकरणाला जातीय स्वरुप नाही, सामाजिक स्वरुप नाही,त्यामुळेच हा वाद व वादातून झालेली हाणामारी हि वयक्तीक स्थरावर झाली आहे.दोन्ही गटाने आपापल्या बाजूने तक्रार दिली असून पोलीसांनी कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत, यात्रेचा कालचा शेवटचा दिवस होता त्यामुळे यापुढे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता व सुव्यवस्था आबादित राखण्यासाठी प्रत्येक नागरीकांनी पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी केले आहे.
