Home यवतमाळ हिवरी वणात मेंढपाळाचा मेंढ्या सह मुक्त संचार वनविभागाचे दुर्लक्ष

हिवरी वणात मेंढपाळाचा मेंढ्या सह मुक्त संचार वनविभागाचे दुर्लक्ष

32

मुख्य संपादक ओंकार चेके

हिवरी वणात मेंढपाळाचा मेंढ्या सह मुक्त संचार वनविभागाचे दुर्लक्ष

येथील वण मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे अनेक प्रकारचे औषधी युक्त वृक्ष पण आहे मात्र या मेंढपाळ याच्या मेंढ्या सह हीवरी वणात प्रवेशाने वणाच्या नुकसानीस सुरुवात झाली आहे मेंढपाळ अनेक लहान मोठे झाडे तोडून मेंढ्यांना चारतात यात अपरिपक्व झाडांची तोड मोठ्या प्रमाणात केल्या जाते पुर्णतः हे मेंढपाळ अमानी करीत आहे खुले आम राज रोस पने संपूर्ण वनात आपल्या हजारो मेंढ्या चारताना दिसुन येत आहे या बाबत वनाधिकारी यांना याची पुर्णतः माहिती असताना मेंढपाळ विरूध्द कोणतेही पाऊल उचलले नाही कदाचित यांची मूकसंमती तर नाही ना असा सवाल वन प्रेमी कडून करण्यात येत आहे, अनेकांचे परिवार गायी म्हशी यावर अवलंबून आहे, अनेक परिवार आपला एकमेव व्यावसाय दुधाचा करीत आहे कारण हीवरी परिसरातील असलेले वन जनावरांना पुरेसे आहे त्या मुळे अनेकांचा कल गायी म्हशी कडे वळला त्या मुळे दुधाचा व्यवसाय सुरू केला ,स्थानिक जनावरांना जंगलात चारा पुरेसा असताना यातच परप्रांतीय या परिसरात येऊन अतीक्रम करून चारा व वणाचा रास करीत आहे जणू काही याना वनविभागाची पूर्व परवानगीच मिळाली हि बाब अत्यंत गंभीर असतानाही वनविभाग या कडे डोळे झाक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे
विशेष म्हणजे हीवरी परिसरात हजारो पाळीव प्राणी असुन या प्राण्यांवर सुध्दा उपासमारीची संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही या करीता मेंढपाळ याचेवर कारवाई करून त्यांना तातडीने वणा बाहेर काढण्याची मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©