Home यवतमाळ तरोडा येथे दंडार नृत्यात पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांनी धरला ठेका..!

तरोडा येथे दंडार नृत्यात पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांनी धरला ठेका..!

33

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

तरोडा येथे दंडार नृत्यात पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांनी धरला ठेका..!
———————————————-
बहुगुणी ठाणेदार विनोद चव्हाण यांचे होतेय सर्वत्र कौतुक
———————————————-
घाटंजी- तालुक्यातील आदिवासी बहुल म्हणून परिचित असलेल्या पारवा पोलीस स्टेशनला काही दिवसापूर्वी रुजू झालेले ठाणेदार विनोद चव्हाण अवैध धंद्यांवर लगाम लावताच जनतेत आनंदाचे वातावरण संचारले होते. मात्र ठाणेदार विनोद चव्हाण हे एवढ्यावरच न थांबता सामाजिक दायित्व अंगिकारून ग्रामीण भागातील जनतेच्या व्यथा समजून ते जनतेत समरस होऊन प्रत्येक कार्यात मोलाचे कार्य निभावत आहे. तरोडा येथे दिवाळी सणानिमित्त आदिवासी पारंपारिक दंडार नृत्य चालू असताना ते स्वतः त्यात सहभागी होवून चांगलाच ठेका धरला होता.
पारवा पोलीस स्टेशनला ठाणेदार विनोद चव्हाण रुजू झाल्यापासून नव नवीन संकल्पना आणून वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. अवैध धंदे, भांडण तंटे यावर अंकुश मिळविल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात लक्ष घातले आहे. नुकतेच दिवाळीच्या तोंडावर उनकेश्र्वर येथिल देवस्थानात जावून बेसहारा निराश्रित लोकांना उबदार ब्लँकेट व भोजन देवून त्यांचा आनंद द्विगुणित केले. पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित करीत आहे. असे एक ना अनेक कार्य त्यांचे हातून घडत आहे. अश्यातच दिवाळी निमित्त तरोडा येथे आदिवासी पारंपारिक दंडार नृत्य सुरू होते त्यात ठाणेदार विनोद चव्हाण त्याठिकाणी पोहचले व त्यांनी दंडारीचे दांडिया हातात घेवून आदिवासी बांधवांच्या नृत्यात सह सहभागी होवून चांगलाच ठेका धरला. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या खुशीत चांगलेच भर पडले. जो तो ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या नृत्य साजरीकरणाकडे कटाक्षाने पाहून त्यांचे कौतुक करीत होते.

Copyright ©