Home यवतमाळ खाकी वर्दीतल्या ठाणेदार विनोद चव्हाण यांनी जपली सामाजिक बांधिलकी

खाकी वर्दीतल्या ठाणेदार विनोद चव्हाण यांनी जपली सामाजिक बांधिलकी

9

 ककार्यकारी संपादक राजू चव्हाण

खाकी वर्दीतल्या ठाणेदार विनोद चव्हाण यांनी जपली सामाजिक बांधिलकी

खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी उनकेश्वर येथील शिव मंदिर परिसरात राहत असलेल्या पन्नास बेसहारा अनाथांना दिवाळीच्या गोड – धोड फराळा बरोबरच उबदार ब्लॅंकेटचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी अल्पावधीतच आपल्या पारवा पोलीस ठाणे हदीतील अनेक अवैध धंद्यास आळा घातल्याने ते गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले आहे. सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत बनलेले ठाणेदार चव्हाण हे गस्तीवर असतांना शेजारच्या पारवा पोलीस स्टेशन च्या हद्दीला लागूनच असलेल्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या प्रसिद्ध व नामांकीत “उनकेश्वर” या देवस्थान ठिकाणास त्यांनी भेट दिली. येथे देवाच्या दरबारी राहत असलेल्या रंजल्या, गांजल्या व बेसहारा महिला – पुरूषांची माहिती घेतली. अशा अनाथ लोकांची सेवा करण्याची संधी ते शोधत होते, आणि तो योगायोग दिवाळी निमित्त जुळून आला. ३ नोव्हेंबर रोजी “उनकेश्वर” येथील पन्नास उपेक्षित लोकांना दिवाळीचे फराळासह आवश्यक ते अन्न -धान्य आणी थंडीत उपयोगी पडावी असे उबदार लोकरच्या चादरी ( ब्लॅंकेट ) भेट दिल्या, यावेळी त्यांच्या सोबत पोलीस अंमलदार अविनाश मुंढे, जिवेंद्र वाघमारे, गोपनीय शाखेतील तुषार जाधव, राहुल राठोड आदीं पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पारवा पोलीस स्टेशनचे
ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या या मदत कार्याचे उनकेश्वर देवस्थान समितीचे उमाकांत राठोड, गणेश चव्हाण, सखाराम पवार, राधाकृष्ण कणाके, संजय जाधव, रमेश दुल्लरवार आदींनी स्वागत केले आहे. या मुळे पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांचे कौतुक होत आहे.

Copyright ©