Home यवतमाळ दिग्रस येथे आ.संजय राठोड यांच्याहस्ते विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा

दिग्रस येथे आ.संजय राठोड यांच्याहस्ते विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा

10

 संपादक सदानंद जाधव

दिग्रस येथे आ.संजय राठोड यांच्याहस्ते विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा

दिग्रस शहराच्या विकासासोबतच खेळाडूंना त्यांच्या हक्काच्या क्रीडा संकुल व महिलांना रोजगार प्राप्त व्हावा,या उदात्त हेतूने आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आ.संजय राठोड यांच्या हस्ते जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि न.पअध्यक्ष सदबजहा मो.जावेद,उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे,जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाज कल्याण सभापती विजय राठोड व पं.स. सभापती सौ.अनिता दिवाकर राठोड यांच्या उपस्थितीत आज शुक्रवार २९ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.

यामध्ये दुपारी एक वाजता जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत दिग्रस तालुका अगरबत्ती प्रकल्प उद्घाटन,दुपारी तीन वाजता दिग्रस शहरातील विशेष रस्ता अनुदान अंतर्गत एक कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन स्थळ अंबिकानगर,पृथ्वीराज नगर तहसील चौक,शनी मंदिर तर दुपारी चार वाजता पुसद बायपासवरील तालुका क्रीडा संकुल येथील ९ कोटी २० लक्ष रुपयाच्या बहुउद्देशीय क्रीडा हॉलच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या वेळेस दिग्रस तालुक्यातील किर्केट खेळाडू नि किर्केट मैदाना बाबत प्रश्न केले असता आ.संजय राठोड यांनी अभियंता शी चर्चा करून किर्केट खेळण्यासाठी मैदान अबाधित ठेवण्याच्या सूचना दिल्या. या वेळेस लक्षद्वीप चे सुरेंद्र राठोड,किर्केट समितीचे इम्रान खान,नरेंद्र थोरात,लखन राठोड,शाम लोखंडे,इम्रान पटेल,जावेद परसुवाले,सदानंद जाधव,मनोज घाडगे,अरविंद जाधव,सागर पाटील,नितीन वास्तर, ईक्रम शेख,मिहीर चव्हाण,रवी बदूकले,अलीम खान,जावेद बालापूर,शकील बाबा,शाहरूख बालापूर,विवेक जाधव,ऋषभ मुजमुले,अमोल राठोड गौरव घाटे संतोष हळदे किरण चार्लावार व इतर अनेक खेळाडू भूमिपूजन कार्यक्रम स्थळी उपस्थित होते

Copyright ©