गेल्या २४ तासात एक बाधित ; दोन कोरोनामुक्त
जिल्ह्यात कलम ३७ नुसार जमावबंदी आदेश लागू
गेल्या २४ तासात एक बाधित ; दोन कोरोनामुक्त
यवतमाळ दि. २९ ऑक्टोबर : गेल्या २४ तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या कोरोणा बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात चार व बाहेरजिल्ह्यात एक अशी एकूण पाच आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण २९१ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित २९० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७२९०६ आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७१११४आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १७८७ मृत्यूची नोंद आहे.
आज बाधित आलेल्यांमध्ये आर्णी येथील एका पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष ५७ हजार ८८९ चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष ८४ हजार ७५१ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ९.६४ असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी ०३४ आहे तर मृत्यूदर२.४५ आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २१६३ बेड उपलब्ध :
जिल्ह्यात कलम ३७ नुसार जमावबंदी आदेश लागू
यवतमाळ दि. २९ ऑक्टोबर : जिल्ह्यामध्ये विविध कारणास्तव निदर्शने, मोर्चा व आंदोलनाची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर आदेश दि. ३१ ऑक्टोबर २०२१ चे मध्यरात्री पासून तर १४ नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.
या आदेशान्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, जमा करून ठेवता येणार नाहीत किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करता येणार नाही.
सदर आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी तसेच विवाह, अंत्ययात्रा, सक्षम अधिकारी यांनी विशेष परवानगी दिलेले मिरवणूक व कार्यक्रम यांना लागू राहणार नाही.



