कार्यकारी संपादक राजू चव्हाण
कुर्ली शिवारातील पैनगंगा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह
——————————————-
घाटंजी- तालुक्यातील कुर्ली शिवारातील पैनगंगा नदी पात्रात अनोळखी ४५ ते ५० वर्षाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे अजूनही नदी पात्राचा ओढा कायम आहे. अश्यातच पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुर्ली परिसरातून जाणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात ४५ ते५० वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृत्युदेह नदीच्या प्रवाहात वाहून आल्याचे समजते. या मृत्यूदेहाची अजून ओळख पटलेली नसून मृत्यकाच्या अंगावर हिरव्या रंगाची अंडर पॅन्ट लक्स कंपनीचे बनियान दिसून आले आहे. ही घटना २९ ऑक्टोंबर च्या बारा वाजता निदर्शनास आली असून याबाबतची माहिती पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई जितेंद्र वाघमारे यांनी दिली. त्यावरून पारवा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ना. पो. का. अविनाश मुंडे हे करीत आहे. याबाबतची माहिती नांदेड जिल्ह्यातील मांडवी, माहूर व यवतमाळ मधील पोलीस स्टेशन ला कळविली असून मृत्यकाच्या कोणी जवळील असेल त्यांनी ७०२०२७७५८३,८३२९८९९५६६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
