हिवरी येथिल दयाराम मारबते यांची विदर्भ प्रो महा लीग कबड्डी स्पर्धा- २०२१ साठी निवड
——————————————–
यवतमाळ- तालुक्यातील हिवरी येथिल नेहरू युवा क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू दयाराम रामकृष्ण मारबते यांची विदर्भ प्रो महा- लीग कबड्डी स्पर्धा- २०२१ मोर्शी साठी होणाऱ्या स्पर्धेच्या निवडीत निवड झाली आहे.
दयाराम मारबते हे हिवरी येथिल नेहरू युवा क्रीडा मंडळाचा खेळाडू असून त्यांनी शालेय जीवनापासून तर महाविद्यालयीन जिवनात उत्तम कौशल्य पणाला लावून अनेक स्पर्धा गाजविल्या आहे. मागील वर्षी रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मारबते यांनी यापूर्वी अनेक स्पर्धेत सहभागी होवून अनेकवेळा यश संपादन केले आहे. त्यांची सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा मिळालेल्या यशामुळे हिवरी गावांसह यवतमाळ जिल्ह्याचे मान उंचावले आहे. त्यांच्या या निवडीमुळे हिवरी परिसरातील कबड्डी खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे हिवरी येथिल गावकर्यात नवचैतन्य निर्माण झाले असून मारबते यांचे सर्वत्र कौतुक करीत त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
