Home यवतमाळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहीका चालकाचे चार महिन्यांचे वेतन रखडले

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहीका चालकाचे चार महिन्यांचे वेतन रखडले

11

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहीका चालकाचे चार महिन्यांचे वेतन रखडले
——————————————–
वाहनचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
——————————————–
दिवाळी पूर्वी वेतन व भत्ते न दिल्यास रुग्णवाहिका सेवा बंद करण्याचा इशारा
——————————————–
यवतमाळ- जिवाची पर्वा न करता दिवस रात्र रुग्णवाहिका वर कार्यरत राहून १५ वर्षांपासून रुग्ण सेवा देणारे रुग्णवाहिका चालक यांना चार महिन्यासह ओटी भत्ता न मिळाल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असून तोंडावर आलेला दिवाळी सन कसा करायचा या विवेचनेत वावरणाऱ्या वाहन चालकाचे दिवाळी पूर्वी थकीत वेतन व भत्ते न दिल्यास रुग्णवाहिका सेवा बंद करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचे सह वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आले आहे.
राज्य स्तरावरून १/९/२०१८ पासून कंत्राटदार मे अशकाम मिडिया प्रा. ली. भोपाळ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथिल आपत्कालीन १०२ रुग्ण वाहिकेवर जिवाची पर्वा न करता १५ वर्षांपासून रुग्णवाहिका चालक कार्यरत राहून रुग्णांना अहोरात्र मेहनत करून सेवा देत आहे. मागील कोरोना काळात कोणतीही तमा न बाळगता उत्कृष्ट सेवा बजावली हे सर्व अधिकाऱ्याचे म्हणणे सुध्दा आहे. मात्र या वाहन चालकावर कुटुंबाची जबाबदारी आहे हे सुध्दा विसरता येणार नाही. मात्र एवढी मोठी सेवा बजावित असताना ज्या कंपनी ला या चालकांच्या वेतनाचे कंत्राट दिले आहे त्यांच्या मनमानी कारभाराने व बेजबाबदार कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अहोरात्र सेवा देणाऱ्या चालकाच्या परिवाराचा कोणताही विचार न करता केवळ आपल्या कंपनीला गलेलठ्ठ बनवीत आहे. ऐन दिवाळी सारखा सन तोंडावर आला असताना थकीत वेतन व भत्ते मिळेल की नाही याची कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही. प्रथमच हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या वाहन चालकाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून दिवाळी सारखा सन अंधारात जाण्याचे संकेत निर्माण झाले आहे. त्यामुळे चार महिन्याचे वेतन व भत्ते दिवाळी पूर्वी देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी व संबधित अधिकारी यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसे न झाल्यास दिनांक १०/१२०२१ पासून आपत्कालीन १०२ रुग्णवाहिका सेवा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग व कंत्राटी वाहन चालक कामगार संघटन यांचे मार्फत कळविण्यात आले आहे. या बंद दरम्यान होणाऱ्या हानीस पुर्णतः भोपाळ येथील अशकाम प्रा. ली. कंपनी जबाबदार राहील असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

Copyright ©