अतीवृष्टीच्या मदती साठी शेतकऱ्यांचा एल्गार..! धरणे आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग
घाटंजी – तालुक्यातील पारवा कुर्ली, शिवणी मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत जाहीर करा तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करा, या मागणीसाठी शेतकरी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते मोरेश्वर वातिले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये संघपाल कांबळे, पांडुरंग निकोडे, महेश पवार, मारुती पवार, मोहन जाधव, अरविंद तुरक, रा. वि. नगराळे, गजानन काकडे, प्रशांत धांदे, गणेश राठोड, रघुनाथ शेंडे, यांनी प्रशासनाच्या अनागोंदी कारभार विरुद्धार्थी तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावे, आणि मदतीपासून वंचित असलेल्या पारवा कुर्ली व शिवणी मंडळातील शेतकऱ्यांना आट दिवसात मदत जाहीर करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे घेराव आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते मोरेश्वर वातिले यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य आशिष लोणकर, अभिषेक ठाकरे, रुपेश कल्यमवार, विजय कडू, अनंत चौधरी, आकाश राठोड, आशिष आडे, मधू लेनगुरे, निळकंठ भोयर, संजय माळोदे, संजय दरणे, राजू राठोड, संजय गोडे, सुधाकर खंडाळकर, पंकज अक्कलवार, सह पारवा, कुर्ली, शिवणी मंडळातील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते
