कार्यकरी संपादक राजू चव्हाण
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस यार्डात खाजगी व्यापाऱ्यांचा कापूस खरेदीचा शुभारंभ
———————————————-
खरेदीच्या पहिल्या दिवशी ८२०५ रुपये भाव
———————————————
घाटंजी- दि.२८/१०/२०२१ रोज गुरुवार ला कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी च्या कापूस यार्डात खाजगी कापूस व्यापाऱ्यांची कापूस खरेदी जाहीर लिलाव द्वारे बाजार समितीचे सभापती श्री अभिषेक ठाकरे यांच्या हस्ते कापूस खरेदी चा शुभारंभ करण्यात आला. या शुभप्रसंगी कापसाला ८०५१ ते ८१८० ₹ पर्यंत भाव देण्यात आला .. या शुभारंभ प्रसंगी सभापती यांनी प्रथम ५ शेतकरी बांधवांचा शेला नारळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा.श्री.अभिषेक शंकररावजी ठाकरे, उपसभापती मा.श्री.अजय येल्टिवार,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे संचालक मा.श्री. आशिषभाऊ लोणकर,संचालक श्री.रमेश डंभारे,श्री.गुणवंत लेनगुरे, श्री.नामदेव राठोड, श्री.नितीन नार्लावार, श्री.नंदकिशोर डंभारे, श्री.नामदेवराव आडे, श्री.जितेंद्र कळसकर, मीराबाई आत्राम, श्री.सागर मानकर ,श्री.गजानन चौधरी,श्री,अजय डेहनकर, अनिता देठे,ललिता पवार, श्री.अकबर तव्वर, सचिव श्री. कपील चन्नावार उपस्थित होते.. या वेळी मा. सभापती यांनी शेतकऱ्यांना ऐकच आव्हाहन केले की, शेतकऱ्यांनी कापूस विक्री करतांना खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला कापूस विक्री करू नये. शेतमाल विक्री बाजार समिती मध्येच करावी. यात योग्य भाव मिळेल आणि कोणतीच फसवणूक होणार नाही. यासाठी आपण सदैव तत्पर राहू असे आवाहन केले.
