पोलीस ठाण्यात निरोप समारंभ
पो. स्टे. वडगांव जंगल येथे नागपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. बाविस्कर , आणि उमरखेड येथे बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक तोगरवाड ,पारवा येथे बदली झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ससाने यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आले होता. स्थलांतर झालेल्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्तावना ठाणेदार पवन राठोड यांनी केली,तर संचलन पोलीस उपनिरीक्षक दरणे सा. यांनी केले , आभार प्रदर्शन भोसले यांनी केले. कार्यक्रमाला पो. स्टे. चे अंमलदार व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
