Home यवतमाळ महिला वरील होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

महिला वरील होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

11

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

महिला वरील होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
——————————————–
अत्याचारातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
——————————————–
घाटंजी- महाराष्ट्र राज्यामध्ये महिला वर्गावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात ऑल इंडिया बंजारा सेवा संघ व विविध संघटनेच्या माध्यमातून घाटंजी तहसिलदारा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून कडक शासन करण्याची मागणी केली.निवेदनामध्ये महिलावरील वर्तमान काळात अत्याचार विनयभंग बलात्कार जाळपोळ थांबविण्यासाठी आणि अशा मानसिक विकृत नराधमांना भविष्यात कडकशिक्षा देण्याबाबत शासनस्तरावरून कठोर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी करण्यात आली तसेच महिला सुरक्षेसाठी शासनाने आरोपीला भरचौकात फाशी देण्याची मागणी करण्यात आली. व अत्याचाराच्या घटनेत ज्या महिला बळी पडलेले आहेत त्यांना संरक्षण देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी. पीडितांचे पुनर्वसन करण्यात यावे महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन घाटंजी तहसिलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी बंजारा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गणेश राठोड आणि विविध संघटनेचे पदाधिकारी यांचे सह प्रमोद भाऊ वातीले, संघपाल कांबळे, पांडुरंग निकोडे,संदीप राठोड,वैशाली राठोड, सरपंच कल्पना काकडे, कटकोजवार ताई, असंख्य महिला व युवक वर्ग उपस्थित होते.

Copyright ©