सय्यद अक्रम आर्णी प्रतिनिधी
अरूनावती धरणाचे पाणी सोडल्याने सतर्कतेचा इशारा
अरुणावती धरणाचे पाणी सोडल्यामुळे आर्णी येथील अरुणावती नदी दुथडी भरून चाललेली आहे पोलीस प्रशासनाने व तहसीलदार यांनी खबरदारी घेत रस्ता बंद करीत नदी व नाल्याकाठी लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अरुणावती धरणाचे पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे करिता लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार पितांबर जाधव यांनी अरुणावती च्या पुलावरील वाहतूक थांबलेली आहे या अगोदर अनेक दुर्घटना घडल्या असुन शासनाने खबरदारी घेत विविध उपाय योजना सुरू केल्या असून जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे
