Home यवतमाळ शेतकऱ्याच्या साथीला मुस्लिम सेवा संघ मैदान

शेतकऱ्याच्या साथीला मुस्लिम सेवा संघ मैदान

9

जिल्हा प्रतिनिधी

शेतकऱ्याच्या साथीला मुस्लिम सेवा संघ मैदान

मुस्लिम सेवा संघ यवतमाळ यांनी शेतकरी मोर्चाला जाहीर समर्थन देऊन सहभाग नोंदवला
केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्या विरोध म्हणून गेल्या कित्येक महिन्यांपासून जगाचा पोशिंदा दिल्लीच्या सरहदिवर बसला आहे.परंतु मोदी सरकार कुठलीच दाद न देत नसल्याने मागील काही महिन्यात ३५०अधिक शेतकरी शहीद झाले याची जाण ठेवत जगाचा पोशिंदा शेतकरी बांधुसाठी मुस्लिम सेवा संघाचा वतीने २७सप्टेबर सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत देण्यात आला.यावेळी मुस्लिम युवा सेवा संघ यवतमाळ जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी यांनी आपल्या संपूर्ण पदाधिकारी सोबत मोठया संख्येने या मोर्चात सहभाग नोदवला .तसेच या मोर्चात मोठ मोठ्या लोकांची व नेत्याची भाषणे झाली.केंद्र सरकार चा या भाषणातून विरोध करीत चांगलाच समाचार घेण्यात आला.मान्यवरांनी केंद्र सरकार शेतकऱ्या विरुद्ध कस सुधबुधीच राजकारण करीत आहे .हे शेतकऱ्यांना पटून सांगत होते.केंद्र सरकार हे संपूर्ण देश विकण्यासाठी आलेलं सरकार आहे हे उदोजगाचे आणि भांडवशाहीच्या लोकांचे सरकार आहे हे चांगल्या प्रकारे पटून दिले .या आंदोलनात शेतकरी विधवा पत्नीने सुधा सहभाग नोंदविला होता.विधवा यांचा हाताने मशाल पेटविण्यात आली .यामध्ये प्रामुख्याने शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर भाई शहा तसेच मुस्लिम युवा सेवा संघ यवतमाळ जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी उपाध्यक्ष जाकिर उमर जिल्हा महासचिव मुजकिर सैयद जिल्हा सचिव सैयद जावेद संघटक रिझवान सैयद संघटक अनिस कुरेशी आदेश भाई दानिश भाई व तसेच संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे राहुल पाटील ऑल इंडिया पँथर सेना चे जिल्हाध्यक्ष सचिन खाडे उपाध्यक्ष राज सोनोने शहराध्यक्ष रुपेश लोखंडे ता अधक्ष्य नितीन धोंगडे पत्रकार बंधू यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थित दर्शविली .मुस्लिम युवा सेवा संघ आणि ऑल इंडिया पँथर सेना चा पदाधिकारी यांनी मोठ मोठ्याने केंद्र सरकार यांचा विरोधात घोषणबाजी केली .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम युवा सेवा संघ जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी उपाध्यक्ष झाकीर उमर जिल्हा महासचिव मुझाकिर सैयद जिल्हा सचिव सैयद जावेद तसेच शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर भाई शहा यांनी सुधा मोठ्या प्रमाणात लोकांनां एकत्र करून कार्यक्रमाला शोभा आणली .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम सेवा संघ यवतमाळ युवा जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी.शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर भाई शहा यांनी मोलाचे सहकार्य केले .

Copyright ©