मुख्य संपादक ओंकार चेके सर
संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान तर काही ठिकाणी झाडे
उन्मळून पडली तर विद्युत ताराही तुटल्या
हिवरी परिसरात संतत धार पावसाने शेतातील पिके जमिनीवर पडली कापूस सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर धकाते यांच्या शेतात सागवाणाचे झाड उन्मळून तारेवर पडले तारा तुटून घरावर पडल्या सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र शेकडो शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे या मध्ये कापूस तुर सोयाबीन असे पिकाचे नुकसान झाले या प्रकरणी शाशनानी तात्काळ दखल घेऊन झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी आहे कपाशीचे बोंडे हि सडले, सोयाबीन मध्ये पाणी साचले तर काहीना कोम फुटले शेतकरी सध्या संकटात सापडला आहे याची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गा कडून करण्यात येत आहे



