9

जिल्हा प्रतिनिधी

हिंदू धर्म गुरु दशनाम गोस्वामी आखाडा समाज कार्यकारिणी गठीत

दशनाम गोस्वामी समाज संघटना वाढविण्याच्या दृष्टीने आणि समाजाने एकत्र येऊन बांधीलकी जोपासण्याच्या दृष्टीने हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा या कार्यकारिणीवर जिल्हाध्यक्ष पदी सौ कुसुमताई यशवंत गिरी ( उमरखेड ) यांची नियुक्ती करण्यात आली आज यवतमाळ येथे जिल्हास्तरीय महिला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हि निवड करण्यात आली

जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ कुसुमताई यांचा सौ सागर ताई पुरी(शिवसेना जिल्हा समन्वयक) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली त्या समितीवर शहरी भागातून सौ कलाश्री पुरी आणि सौ रश्मी रंजीत गिरी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर ग्रामीण भागातून अंजली गिरी (बेलोरा) व सौ अर्चना गिरी ( हिवरी) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली महामंत्री पदी सौ मीनल भारती तर सह महामंत्री आशा गिरी कोषाध्यक्षपदी प्रतिभा गिरी व सहकोषाध्यक्ष सौ अर्चना दिलीप गिरी. सल्लागारपदी सौ सागर ताई पुरी यांची नियुक्ती करण्यात आली तर संघटिका म्हणून सहर्ष सचिन भारती सौ रुपाली अतुल गिरी यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली यावेळी कुसुमताई गिरी व सौ सागर ताई पुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले….

 

 

Copyright ©