Home यवतमाळ पंधरा हजार लोकवस्ती असलेल्या निंगनूर येथील पशुपालक पशु चिकित्सालयाच्या प्रतिक्षेत

पंधरा हजार लोकवस्ती असलेल्या निंगनूर येथील पशुपालक पशु चिकित्सालयाच्या प्रतिक्षेत

14

मैनुद्दीन सौदागर उमरखेड प्रतिनिधी

पंधरा हजार लोकवस्ती असलेल्या निंगनूर येथील पशुपालक पशु चिकित्सालयाच्या प्रतिक्षेत

तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निंगनुर या पंधरा हजार लोकवस्ती असलेल्या गावामधील बहुतांश रहिवाशांचे जिवनमान शेती व गोधनावर अवलंबून आहे . शेती सोबतच पशुपालन करणे हा बळी राजाचा मुख्य व्यवसाय असल्याने येथे पशु वैद्यकीय चिकीत्सालयाची नितांत आवश्यकता असतांना स्थानिक लोकप्रतिनीधी व प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे येथे शेतकन्यांच्या मुक्या सवंगड्यांसाठी अद्यापही पशु चिकीत्सालय उभारण्यात आले नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करित आहेत . निंगनूर येथे गुरांचा दवाखाना नसल्याने जनावरांना आजार झाल्यास ढाणकी किंवा फुलसावंगी येथे घेउन जावे लागते. शासनाच्या नियमाप्रमाणे एक हजार जनावरांची संख्या असलेल्या गावांमध्ये पशु वैद्यकीय दवाखाना असणे बंधनकारक आहे. मात्र निंगनुर मध्ये जवळपास अंदाजे एक लाखाच्या वर पशुची संख्या आहे. त्यामध्यें या ठिकाणी शेतकरी व मजूरदार वर्ग यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी पशु ची संख्या सुद्धा जास्त आहे. पशु पालन सुद्धा जास्त आहे. वेगवेगळ्या आजारांनी मुकी जनावरे नेहमी आजार ग्रस्त असतात .गत काही महिन्यात येथील जनावरांना बिमारीची लागण झाली होती. बऱ्याच वेगवेगळ्या आजाराने थैमान घातले होते.त्यामध्यें येथील बरेच जनावरे दगावली होती. येथील जनावरे गावामध्ये दवाखाना नसल्याने , वेळेवर उपचार न झाल्याने येथील बऱ्याच प्रमाणात जनावरे दगावली होती .

गावामध्ये पशु वैद्यकीय दवाखाना नसल्याने असे अनेक गाय म्हैस, शेळी, बैल अश्या अनेक जनावरांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे येथील जनावरांना आजार झाल्यास येथील शेतकऱ्याना ने आन करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे संबधित विभागाने जातीने लक्ष देऊन येथे दवाखाना उपलब्ध करुन द्यावा. यामध्ये हा दवाखाना स्थापन करण्याचा अधिकार शासनाकडे असल्याने तसा प्रस्ताव सादर करण्याचे दृष्टीने नवीन पशु वैद्यकीय दवाखांन्याची २८ ऑगस्ट २०२० रोजी, जि.प. च्या सभेमध्ये मंजुरी घेतली होती. परंतु एक वर्ष उलटूनही आतापर्यंत कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कोणतेच भूमिपूजन किंवा कोणतेच काम झाले नाही. येथील समस्त जनता पशु वैद्यकीय दवाखान्याच्या प्रतीक्षेतच आहे.तरी संबधित विभागाने लवकरात लवकर हा दवाखाना मंजूर करून काम सुरु करुन द्यावे. व हा होणारा त्रास थांबवावा. अशी मागणी निगंनुर येथिल गावकरी करीत आहे.

Copyright ©