वणी तालुका प्रतिनिधी निलेश चौधरी
निवडणुकीचे वारे लागताच,युवा नेत्यांची स्टंटबाजीला सुरुवात
उपोषणाच्या नावाखाली, राजकिय पोळी
विधानसभा क्षेत्रातील निवडणूका जवळ येऊ लागल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजसेवेच्या नावावर स्टंटबाजी करुन, विज ग्राहकांसाठी तत्पर असलेल्या, विजवितरणाच्या कार्यात अडचन निर्माण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात,तथाकथित समाजसेवक करित असल्याचे दृष्य आज रोजी झालेल्या आंदोलनात पहायला मिळाले आहे. झरी-जामणी तालुक्यात होणारा विजेचा लपंडाव हा नैसर्गिक वातावरणामुळे चालू बंद होण्याचा प्रकार होत असला तरी, उन्हाळ्यामध्ये विजेच्या डागडुजीचे काम, हे विद्युत महामंडळाच्या कर्मचारी योग्य रित्या करित आहे.तरी सामाजिक कार्याचा पुळका, अंगीकारण्याची सवय पडलेल्या भावी नेत्यांना, समोर होणाऱ्या निवडणुकीला नजरेसमोर ठेवून पोस्टरबाजी व युवकांना आमिषे देऊन सामाजिक कार्यकर्त्यांने आंदोलनाचा पवित्रा अवलंबिला आहे. त्यामुळे पोस्टर आणि सोशल मीडियावर वायरल असलेल्या तथाकथित, सामाजिक कार्यकर्त्यांला आंदोलनाची पोळी शेकण्याचे काम करू देणे कितपत योग्य.? सवाल जनतेचा ..!!निवडणुका जवळ आल्यानंतर बेडूक-उड्या मारणारे सामाजिक कार्यकर्ते हे काठावरती उभे असतात, परंतु सच्चा समाजसेवक हा दुरावला जातो. त्यामुळे होणाऱ्या समोरील निवडणुकीत,देखावा करणाऱ्या सामाजिक पोस्टर बाॅयला, जनतेनी कितपत पाठिंबा द्यायचा हे झरी तालुक्यातील नवयुवकांनी ठरवायचे आहे.
—————————————
उन्हाळ्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील विजे संदर्भातील, डागडुजीचे काम हे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी योग्य रित्या पूर्ण केले आहे. पावसाचा तांडव बघता, होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे ,कधी काळी विज खंडित झाली असल्यास त्यासाठी महावितरणाचे कर्मचारी अधिकारी हे 24 तास हजर असतात
महावितरण अधिकारी राठोड झरी-जामणी
